सिंधुदुर्ग : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंगणेवाडीच्या (Anganewadi) श्री देवी भराडी देवीचा यात्रोत्सव 24 फेब्रुवारीला संपन्न होणार आहे. देश विदेशातील भाविक आंगणेवाडी यात्रेला उपस्थिती लावतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून हा उत्सव कोरोनाच्या सावटाखाली पार पडत आहे. भराडी देवी जत्रोत्सवाच्या तारीख निश्चितीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील भाविकांचं लक्ष लागलेलं असतं. यात्रेची तारीख निश्चित झाली की, कोकणात जाणाऱ्या रेल्वे, बसचं तिकीट बुकिंग करण्यासाठी मोठी गर्दी होते.
यंदाच्या वर्षी रेल्वेने विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेत कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा दिला आहे. आंगणेवाडी आणि होळी सणादरम्यान रेल्वे विशेष गाड्या सोडणार आहे. आंगणेवाडी आणि शिमगा उत्सवादरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेच्या समन्वयाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
01) गाडी क्र. 01161 / 01162 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) विशेष :
* गाडी क्रमांक 01161 / 01162 लोकमान्य टिळक टर्मिनस - सावंतवाडी रोड (साप्ताहिक) विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून 23 फेब्रुवारी 2022 (बुधवार) रोजी 23.45 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी सकाळी 10.00 वाजता ही गाडी सावंतवाडीला पोहोचेल.
* गाडी क्रमांक 01162 सावंतवाडी रोड - लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 24 फेब्रुवारी 2022 (गुरुवार) रोजी सकाळी 11:00 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी लोकमान्य टिळक टर्मिनस येथे 23:05 वाजता पोहोचेल.
या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबतील.
कोच रचना : एकूण 23 कोच = फर्स्ट एसी - 01 कोच, 2 टायर एसी - 01 कोच, 3 टायर एसी - 05 कोच, स्लीपर - 11 कोच, सेकंड सीटिंग - 03 डबे, SLR - 02.
02) गाडी क्र. 01163 / 01164 दादर - सावंतवाडी रोड - दादर (दैनिक) विशेष :
* गाडी क्रमांक 01163 दादर - सावंतवाडी रोड (दैनिक) विशेष गाडी दादर येथून 16 ते 19 मार्च 2022 या कालावधीत 12.10 वाजता सुटेल. ट्रेन त्याच दिवशी 23.20 वाजता सावंतवाडी रोडला पोहोचेल.
* गाडी क्रमांक 01164 सावंतवाडी रोड - दादर (दैनिक) विशेष गाडी सावंतवाडी रोडवरून 16 ते 19 मार्च 2022 पर्यंत 23.50 वाजता सुटेल. ट्रेन दुसऱ्या दिवशी 11.10 वाजता दादरला पोहोचेल.
या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ स्थानकावर थांबतील.
कोच रचना : एकूण 17 कोच = 2 टियर एसी - 01 कोच, 3 टियर एसी - 02 कोच, स्लीपर - 07 कोच, सेकंड सीटिंग - 05 कोच, SLR - 02.
वरील गाड्यांसाठी बुकिंग 5 फेब्रुवारीपासून सर्व प्रवासी आरक्षण प्रणाली (PRS) काऊंटर आणि IRCTC वेबसाईटवर सुरू होईल. सामाजिक अंतर, सॅनिटायझेशन इत्यादींसह COVID-19 संबंधी राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व नियम ट्रेन आणि रेल्वे स्थानकांवर पाळले जावेत. तसेच, प्रवाशांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेकडून करण्यात आले आहे.
हेही वाचा :
- आंगणेवाडी यात्रेची तारीख ठरली; 24 फेब्रुवारीला होणार यात्रोत्सव
- Breaking: सचिन वाझेंच्या पुनर्नियुक्तीसाठी मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि पर्यावरण मंत्र्यांचा दबाव; परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट
- Praveen Raut Arrested : संजय राऊतांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना अटक; ईडीची कारवाई
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha