Share Market: आज सलग तिसऱ्या सत्रामध्ये शेअर बाजारमध्ये तेजी आल्याचं दिसून आलं असून निफ्टी 17,780 वर स्थिरावला आहे. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 695.76 अंकांनी वधारला आहे तर निफ्टीही 203.20 अंकानी वधारला आहे. सेन्सेक्समध्ये 1.18 टक्क्यांची वाढ होऊन तो 59,558.33 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 1.16 टक्क्यांची वाढ होऊन तो 17,780 वर पोहोचला आहे. 


आज 2243 कंपन्यांच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे तर 1038 शेअर्समध्ये घसरण झाली आहे. 90 कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत कोणताही बदल झाला नाही. 


आज बाजार बंद होताना ऑटो, मेटल, उर्जा, ऑईल अॅन्ड गॅस, बँक, आयटी, फार्मा आणि रिअॅलिटी या सर्वच सेक्टरच्या शेअर्समध्ये वाढ झाल्याचं दिसून आलं आहे.  BSE मिडकॅप  आणि स्मॉलकॅपमध्येही 1 ते 1.5 टक्क्यांची घसरण झाली आहे. 


मंगळवारी शेअर बाजारात IndusInd Bank, Bajaj Finserv, HCL Technologies, Bajaj Finance आणि HDFC Life या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये मोठी वाढ झाली असून Tech Mahindra, Britannia Industries, UltraTech Cement, Hero MotoCorp आणि Nestle IndiaL या कंपन्यांच्या निफ्टीमध्ये घसरण झाली आहे.


या कंपन्यांचे शेअर्स वधारले



  • IndusInd Bank- 5.75 टक्के

  • Bajaj Finserv- 5.04 टक्के

  • HCL Tech- 3.37 टक्के

  • Bajaj Finance- 3.32 टक्के

  • HDFC Life- 3.25 टक्के



या कंपन्यांचे शेअर्स घसरले



  • Tech Mahindra- 1.51 टक्के

  • UltraTechCement- 1.00 टक्के

  • Britannia- 0.97 टक्के

  • Nestle- 0.92 टक्के

  • Hero Motocorp- 0.89 टक्के


प्री-ओपनिंगमध्ये शेअर बाजार कसा होता?


प्री-ओपनिंग सत्रात शेअर बाजारात तेजी दिसून आली. निफ्टी 17500 अंकांवर गेला होता. सकाळी 9.01 वाजता सेन्सेक्स 365.59 अंकांनी वधारला होता. तर, निफ्टी 62.80 अंकांनी वधारला. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha