Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यातील मडिलगेमध्ये झालेल्या सशस्त्र दरोड्यात पत्नी जागीच ठार झाली, तर पती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. या हल्ल्यात चौघा सशस्त्र दरोडेखरांनी माजी उपसरपंच सुशांत गुरव यांच्या घरावर दरोडा टाकून साडे दहा लाखांची लूट केली. लूट करत बदमाशांनी पत्नी पूजा गुरव यांची हत्या केली. ही घटना रविवारी पहाटे घडली. दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुशांत गुरव जखमी झाले. दरोडेखोरांनी पूजा यांच्या गळ्यातील दागिने व रोख रक्कम लंपास केल्याची फिर्याद सुशांत गुरव यांनी आजरा पोलिसात दिली. पोलिसांकडून दरोडा की खून या अनुषंगाने तपा सुरु केला आहे.
मध्यरात्री घरात घुसून मारहाण
पहाटेला सशस्त्र दरोडेखोरांनी घरामध्ये प्रवेश करत गुरव दाम्पत्याला मारहाण सुरू केली. यामध्ये पूजा यांच्या डोक्यामध्ये लोखंडी राॅडने प्रहार केल्याने पूजा जागीच ठार झाल्या. दरोडेखोरांच्या हल्ल्यात सुशांत गुरव जखमी झाले. दरोडेखोरांनी सुमारे साडेदहा लाखांची लूट केली. गुरव यांची दोन लहान मुले घरामध्येच झोपली होती. मात्र, दरोडेखोरांनी त्यांना काहीही केलेलं नाही. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार सुशांत गुरव मध्यवस्तीत गुरव गल्लीत घर असून पती-पत्नी आचारी म्हणून काम करत असत. मध्यरात्री अडीचच्या सुमारास सुशांत गुरव बाथरूमला गेले असताना चौघे दरोडेखोर घरात घुसले. त्यांनी दरवाजाला कडी घालून पूजा गुरव यांच्या तोंडावर रुमाल दाबून धरून गळ्यातले सोने व पैसे काढून घेतले. यावेळी त्यांच्या डोक्यात धारदार शस्त्राने वार केला. त्यामुळे त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या. वर्मी घाव झाल्याने त्या जागीच गतप्राण झाल्या.
श्वान घरातभोवतीच घुटमळले
बाथरुममध्ये बंदिस्त असलेल्या सुशांत गुरव बाथरूमचा दरवाजा मोडून बाहेर आले. एका दरोडेखोराने सुशांत यांनाही मारहाण केली. दरोडेखोर पळून जाताच सुशांत यांनी दोन्ही मुलांना घेऊन दारात येत आरडाओरड केली. यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना कळविले. घटनास्थळी पोलिस श्वानपथकासह आले, पण श्वान घरातभोवतीच घुटमळले.
इतर महत्वाच्या बातम्या