Lionel Messi offered a bisht : फुटबाॅल वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वांत रोमांचकारी आणि श्वास रोखून धरायला लावणारी फायनल मॅच झाली. अर्जेंटीनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सचा पराभव तब्बल 37 वर्षांनी वर्ल्डकपवर नाव कोरले अन् लिओनेल मेस्सीचे सुद्धा स्वप्न साकार झाले. जगाच्या पाठीवर मेस्सी जगज्जेता झाल्याचा आनंद साजरा केला गेला. अर्जेटिनाला वर्ल्डकप प्रदान करताना सोहळ्यात एकच वेगळा प्रसंग दिसून आला. त्यामुळे अनेक चाहत्यांना नक्कीच प्रश्न पडला असेल. मेस्सीच्या (Lionel Messi was offered a bisht) हाती वर्ल्डकप सोपवत असतानाच कतारचे राजे एक पारंपारिक अरबी बिष्ट (a bisht, a traditional Arab cloak) अर्पण केला. मेस्सीने शेख तमीम बिन हमाद अल थानी (Sheikh Tamim bin Hamad Al Thani) यांनी फिफा अध्यक्ष जियानी इन्फँटिनो (FIFA President Gianni Infantino) यांच्याकडून ट्रॉफी घेण्यापूर्वी आणि सहकाऱ्यांसोबत ट्रॉफी उंचावण्यापूर्वी तो बिष्ट खांद्यावर ठेवण्याची परवानगी दिली.
बिष्ट म्हणजे काय? (What is a bisht)
बिश्ट हा एक लांबलचक बिनबाह्यांचा कोट आहे. ट्रिमिंग तसेच अस्सल सोन्यापासून बनवला जातो. जी पांढऱ्या थॉबवर परिधान केला जातो. प्रामुख्याने गल्फमध्ये परिधान केले जाणारे, हे एक वस्त्र आहे. जे अनेक शतकांपासून विशेष प्रसंगी परिधान केले जाते. याकडे कौतुक आणि आदराचे प्रतीक म्हणून पाहिले जाते आणि सामान्यत: राजकारणी, शेख (राजे) आणि इतर उच्च दर्जाच्या व्यक्तींना परिधान केले जाते.
बिष्टमध्ये काय खास आहे? (What is special about the bisht)
एक्सेटर विद्यापीठातील इस्लामिक अभ्यासाचे प्राध्यापक मुस्तफा बेग यांनी डीपीए वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार बिश्त (bisht) हा एक औपचारिक कोट आहे जो राजेशाही, मान्यवर, त्यांच्या लग्नाच्या दिवशी वर आणि पदवीधर समारंभात परिधान करतात. त्यामुळे निवडक लोकच प्रत्यक्षात बिष्ट घालतील. ते पुढे म्हणाले की ,त्यांनी मुळात मेस्सीच्या खांद्यावर ठेवून सन्मान केला. हे सन्मानाच्या चिन्हासारखे आहे आणि केवळ एक प्रकारचे सांस्कृतिक स्वागत आणि सांस्कृतिक स्वीकृती आहे. बेग पुढे म्हणाले की, हा कतारच्या राष्ट्रीय पोशाखाचा देखील भाग आहे.परंतु, केवळ महत्त्वाच्या प्रसंगी. आणि हा एक सर्वोच्च प्रसंग आहे. म्हणजे, कदाचित यापेक्षा मोठा कोणताही प्रसंग नसेल, म्हणून त्यांनी तो सन्मान म्हणून मेस्सीच्या खांद्यावर ठेवला.
काय म्हणाले आयोजक?
कतारच्या विश्वचषक आयोजन समितीचे सरचिटणीस हसन अल-थवाडी म्हणाले की, अधिकृत प्रसंगी आणि उत्सवासाठी परिधान केलेला पोशाख आहे. हे मेस्सीचे सेलिब्रेशन होते. विश्वचषकाला आपली अरब आणि मुस्लिम संस्कृती जगाला दाखवण्याची संधी मिळाली. हे कतारबद्दल नव्हते, तर हा एक प्रादेशिक उत्सव होता.
इतर महत्वाच्या बातम्या