कोल्हापूर : माझ्यासारख्या अल्पसंख्याकांच्या मागे का लागलात? असा प्रश्न वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केल्यानंतर राष्ट्रवादीत संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुश्रीफ यांनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या समरजितसिंह घाटगे यांनी जोरदार पलटवार केला आहे. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का? अशी विचारणा समरजित यांनी केली.  


महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही


समरजित घाटगे यांनी मुश्रीफांवर चांगलाच हल्लाबोल केला. ते म्हणाले की, ते तुमच्या वडिलांच्या वयाचे आहेत. त्यांच्यावर कुणीही असले आरोप करायचे धाडस करत नाही, ते तुम्ही केलं, तुम्ही हे घोर पाप केलं आहे. महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. समरजित घाटगे यांना काय बोलायचं ते बोला, पण तुम्ही  जाहीर माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. 


आता त्यांची अशी वक्तवीत आहेत 


समरजित घाटगे यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी बोलले होते की घाटगे यांना महत्त्व देण्याचा संबंध नाही. आता त्यांची अशी वक्तव्ये येत आहेत. मला त्याची काळजी करण्याची गरज नाही. कागलची स्वाभिमानी जनता आहे, माझी पाठराखण करणार आहे. माझ्या मागे शरद पवार यांचा आशीर्वाद आहे, त्यामुळे मला कोणत्या गोष्टीची काळजी करण्याची गरज नाही.  अशा बऱ्याच धमक्या त्यांनी मला आधी दिल्या आहेत. मी त्यांच्या गोष्टींना फारसे सिरीयस घेत नसल्याचे ते  म्हणाले. 


मला काही बोलतात ते बोलू देत, पण मला त्या वक्तव्याचा मला राग, संताप आहे आणि खंत वाटत असल्याचे  समरजित यांनी सांगितले. पवार साहेबांचे अनेक वर्षाचे राजकारण आहे. विरोधी पक्षानेही त्यांच्यावर असे बोलायचे धाडस केलं नाही. मात्र, ते काम पालकमंत्री मुश्रीफ यांनी केलं आहे. 


मुश्रीफ यांनी आता शरद पवार यांच्यावर जातीवाचक आरोप केला. त्यांच्या या वक्तव्याचा मी निषेध करतो. ज्या व्यक्तीने तुम्हाला सर्व पदे दिली तेंव्हा त्यांना अल्पसंख्यांक म्हणून विषय नव्हता का? महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. शरद पवार आले, सभा घेतली त्यांनी आपले विचार मांडले तुम्ही त्यांच्यावर आरोप करण्याचे धाडस करत आहात.


ते नेहमीच जातीचे कार्ड वापरतात


ते नेहमीच जातीचे कार्ड वापरतात, ईडीच्या छाप्यानंतरही त्यांनी हे वक्तव्य केलं होतं. त्यावेळी सुद्दा त्यांनी मी अल्पसंख्यांक असल्याने मला टार्गेट केलं जात असल्याचे सांगितले होते, पण नंतर त्यांनी काय केलं हे सर्वांना माहिती आहे. शरद पवार यांच्यावर जातीचा आरोप करत आहेत तो चुकीचा आहे. राजाविरुद्ध प्रजा असं म्हणत असाल तर 2009 ला संभाजी राजे छत्रपती देखील लोकसभेला उभारले होते 


जर तुम्ही तसे म्हणत असाल तर 2009 ला ठरवून संभाजी राजे छत्रपती यांचा आतून पराभव केला. त्यांनी मला टार्गेट केला आहे. माझ्या पत्नीला देखील टार्गेट केला आहे. परवा त्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी आईसाहेबांना देखील टार्गेट केला आहे. विरोधकांच्या कोणत्याही टीकाटिपणीवर आम्ही विरोध करणार नाही. त्यांच्या अशा या वक्तव्यामुळे कागलचे नाव खराब होत आहे. कृपया मुश्रीफ यांनी कागलची बदनामी करू नये, असा टोला त्यांनी  लगावला.


इतर महत्वाच्या बातम्या