कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur News) कागलच्या ऐतिहासिक गैबी चौकामध्ये भाजप नेते समरजितसिंह घाटगे यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. काल (3 सप्टेंबर) कागलच्या गैबी चौकामध्ये झालेल्या विराट सभेमध्ये बोलताना शरद पवार यांनी अजित पवार गटात सामील झालेल्या वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल विधानसभेच्या मैदानात जागा दाखवणार असल्याची गर्जना करताना लाचार असा उल्लेख केला. 



शरद पवार यांनी हसन मुश्रीफ यांचा प्रत्यक्ष उल्लेख केला नाही. मात्र, लाचार असा उल्लेख करत घणाघाती प्रहार केला. समरजितसिंह घाटगे यांना आमदार झाल्यानंतर मंत्रीपद देणार असल्याची सुद्धा घोषणा केली. त्यामुळे कागलच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा पुढील दोन महिन्यांसाठी रणसंग्राम सुरू झाला आहे. दरम्यान शरद पवार यांच्या कोल्हापूर दौऱ्याचा आजचा (4 सप्टेंबर) दुसरा दिवस आहे. आज सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी विविध मुद्द्यांना स्पर्श केला.




अजून किती लाचार टार्गेटवर आहेत?


यावेळी मुश्रीफ यांचा अप्रत्यक्ष लाचार असा उल्लेख केल्याने अजून किती लाचार टार्गेटवर आहेत? अशी विचारणा शरद पवार यांना करण्यात आली. तसेच गेल्या चार पाच वर्षांत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यासह अनेक नेते घरवापसीच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, ज्या भागांमध्ये ज्यांचं काम चांगल आहे. त्यांची उपयुक्तता किती आहे हे जाणून घेतलं जाईल. मात्र, पक्षासोबत प्रामाणिकपणे राहिले आहेत त्यांची मते पहिल्यांदा जाणून घेतल्या पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला जाईल. त्यांचे सार्वजनिक जीवनातील काम सुद्धा पाहिले जाईल, असेही त्यांनी सांगितले. नागरिकांमध्ये ज्यांच्याबद्दल सकारात्मक भावना आहे त्यांचं स्वागत असल्याचं शरद पवार म्हणा्ले. 


समरजति घाटगे यांची गरज विधानसभा मतदारसंघामध्ये होती


कागल मतदारसंघाबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले की समरजति घाटगे यांची गरज विधानसभा मतदारसंघामध्ये होती. त्यानुसार विविध ठिकाणी निर्णय घेणार असल्याचे शरद पवार म्हणाले. समरजित घाटगे यांनी पक्षामध्ये येण्यासाठी आम्ही सर्वांनी प्रयत्न केल्याचे शरद पवार यांनी नमूद केले. समरजित घाटगे चुकीच्या ठिकाणी होते, आता ते योग्य ठिकाणी आले असल्याचेही शरद पवार यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या