कोल्हापूर : कसबा बावडा नेहमीच आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांच्या पाठीशी राहिला. बावड्यात आल्यानंतर या मातीची जादू कळते, जसा बावडा सतेज पाटील यांच्या मागे उभा राहिला तसाच एक दिवस महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा राहील, असा काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला. यावेळी बोलताना विश्वजित कदम यांनी देशात काँग्रेसच्या 99 खासदारांचे 100 खासदार करण्यात कोल्हापूरकरांचा हातभार असल्याचेही ते म्हणाले. सांगलीच्या जागेवरून वाद सुरु असताना सतेज पाटील यांनी मोठा आधार दिल्याचे सांगितले. 






इतरांना आदर्श ठरेल असे करायचे असा सतेज पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो  


कसबा बावड्यामध्ये 69 लाख रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या गाव चावडी तलाठी कार्यालयाचा नूतन इमारत उद्घाटन समारभं आमदार विश्वजित कदम यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना विश्वजीत कदम म्हणाले की, जे करायचं ते चांगलेच करायचे इतरांना आदर्श ठरेल असे करायचे असा सतेज पाटील यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यामुळे भव्य वास्तू साकारली आहे.






कोल्हापूरकरांचे आभार मानण्यासाठी आम्ही पुन्हा येणार  


कदम पुढे म्हणाले की विशाल पाटील यांच्यासोबत सांगली जिल्ह्याचे दौरे सुरू आहेत. कोल्हापूरकरांचे आभार मानण्यासाठी आम्ही पुन्हा येणार आहोत. कोल्हापूरचे तत्कालीन पालकमंत्री पतंगराव कदम यांचे कोल्हापूरशी जिव्हाळ्याचे नाते होते. कोल्हापूर, सांगलीत पै पाहुण्यांचे संबंध आहेत, याचा विशाल पाटील सांगलीच्या निवडणुकीत फायदा झाला. हेच ऋणानुबंध कोल्हापूरचे आणि पतंगराव कदम यांच्यात होते. त्यांच्या पुतळ्याचे शिक्षक दिनाचै औचित्य साधून अनावरण होणार आहे. त्यासाठी राहुल गांधी येणार असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. 


विशाल पाटील यांच्या विजयात सतेज पाटील यांचा खूप मोठा वाटा


दरम्यान, सांगली लोकसभेच्या जागेसाठी खूप संघर्ष करावा लागला. या निवडणुकीत काँग्रेस पक्षांतर्गत सर्वात मोठा आधार कोणी दिला असेल तर तो आमदार सतेज पाटील यांनी दिला. सांगलीत खासदार विशाल पाटील यांच्या विजयात सतेज पाटील यांचा खूप मोठा वाटा असल्याचे विश्वजीत कदम म्हणाले. देशात काँग्रेसच्या 99 खासदारांचे 100 खासदार करण्यात कोल्हापूरकरांचा हातभार असल्याचेही ते म्हणाले


इतर महत्वाच्या बातम्या