Radhanagari Dam : कोल्हापूर जिल्ह्यासह शहरात पावसाने उघडीप दिली असली, धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने धरणांच्या तसेच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. आज सायंकाळी 4 वाजून 11 मिनिटांनी बंद झालेले स्वयंचलित 3 दार उघडले. त्यानंतर चार मिनिटांच्या फरकाने चौथे दारही उघडले.
त्यामुळे राधानगरी धरणाची एकूण 4 दरवाजे (3, 4, 5, 6 ) उघडले आहेत. धरणाच्या पाॅवर हाऊसमधून 1600 क्युसेक, तर उघडलेल्या 4 दरवाज्यातून 5712 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे राधानगरी धरणातून एकूण विसर्ग 7 हजार 312 क्युसेकने सुरू आहे. पाटबंधारे विभागाने याबाबत माहिती दिली आहे.
दरम्यान, पंचगंगेची पातळी सकाळपासून स्थिर आहे. सायंकाळी चार वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी 41 फुट 8 इंच इतकी झाली आहे. पंचगंगा सध्या इशारा पातळीवरून वाहत असून तिची धोका पातळी 43 फुट आहे. जिल्ह्यातील 73 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली आहेत?
- पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
- भोगावती नदी- हळदी, सरकारी कोगे, राशिवडे, शिरगांव, तारळे व खडक कोगे
- कासारी नदी- वालोली, यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे, बाजारभोगाव, पेंडाखळे, कांटे, करंजफेन व कुंभेवाडी
- कडवी नदी- सवते सावर्डे, शिरगांव, सरुड पाटणे, कोपार्डे, भोसलेवाडी व वालुर
- वेदगंगा नदी- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापूर, म्हसवे, गारगोटी, शेणगांव व शेळोली
- घटप्रभा नदी- कानर्डे सावर्डे, हिंडगांव व अडकूर
- वारणा नदी- चिंचोली, माणगांव, कोडोली, तांदुळवाडी, शिगांव, खोची, मांगलेसावर्डे, चावरे व दानोळी
- दुधगंगा नदी- दत्तवाड, सुळकुड, सिध्दनेर्ली, बाचणी, सुळंबी, तुरंबे व वाळवे
- कुंभी नदी- शेणवडे, कळे, वेतवडे व मांडुकली
- तुळशी नदी- बीड, आरे व बाचणी
- ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, चंदगड, कोवाड, हल्लारवाडी व कोकरे
- धामणी नदी- सुळे व आंबर्डे
- हिरण्यकेशी नदी- निलजी, ऐनापूर, गिजवणे व चांदेवाडी
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी 234.76 दलघमी, तुळशी 91.53 दलघमी, वारणा 883.92 दलघमी, दूधगंगा 610.34 दलघमी, कासारी 64.49 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 66.82 दलघमी, पाटगाव 94.61 दलघमी, चिकोत्रा 40.72 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, आंबेआहोळ 30.98 जंगमहट्टी, जांबरे, चित्री मध्यम प्रकल्प व कोदे लघू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे
हातकणंगले- 3.4 मिमी, शिरोळ -1.3 मिमी, पन्हाळा- 28.7 मिमी, शाहूवाडी- 38.1 मिमी, राधानगरी- 63.4 मिमी, गगनबावडा- 55.4 मिमी, करवीर- 8.8 मिमी, कागल- 14.1 मिमी, गडहिंग्लज- 12.7 मिमी, भुदरगड- 32.4 मिमी, आजरा- 65 मिमी, चंदगड- 52.7 मिमी असा एकूण 26.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.