Kolhapur Hatkanangle Lok Sabha : कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये पहिल्या चार तासांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूरमध्ये शाहू महाराज विरुद्ध संजय मंडलिक अशी थेट लढत होत आहे, तर हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये तिरंगी लढत होत आहे. राजू शेट्टी विरुद्ध धैर्यशील माने विरुद्ध सत्यजित पाटील सरुडकर असा सामना हातकणंगले लोकसभेसाठी रंगला आहे. सकाळपासूनच उत्साहाने कोल्हापूर आणि हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे.






पहिल्या चार तासांमध्ये कोल्हापूरमध्ये पहिल्या चार तासांमध्ये कोल्हापुरात 23.77 टक्के मतदानाची नोंद झाली. हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये हातकणंगले तालुक्यात आणि कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये करवीर तालुक्यात सर्वाधिक मतदानाची नोंद पहिल्या चार तासांमध्ये झाली आहे. त्यामुळे उमेदवारांचा बालेकिल्ला असलेल्या ठिकाणी ठिकाणी मतदान चुरशीने होत असल्याचे चित्र आहे. 


कोल्हापुरात मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी


कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत चंदगड तालुक्यात 20.56 टक्के मतदानाची नोंद झाली. कागल तालुक्यामध्ये 23.18 टक्के मतदानाची नोंद झाली. करवीर तालुक्यात 31.95 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर उत्तर मध्ये 23.24 टक्के मतदानाची नोंद झाली. कोल्हापूर दक्षिण मध्ये 22.55 टक्के मतदानाची नोंद झाली. राधानगरीमध्ये 21.49 टक्के मतदानाची नोंद झाली. 






हातकणंगले लोकसभा मतदारसंघांमध्ये सकाळी 11 वाजेपर्यंत 20.74 टक्के मतदानाची नोंद झाली. यामध्ये हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील हातकणंगले तालुक्यात 24.12 टक्के मतदानाची नोंद झाली. इचलकरंजीमध्ये 20.26 टक्के मतदानाची नोंद झाली. इस्लामपूरमध्ये 21.77 टक्के मतदानाची नोंद झाली. शाहुवाडीमध्ये 17.16 टक्के मतदानाची नोंद झाली. शिराळामध्ये 19.76 टक्के मतदानाची नोंद झाली, तर शिरोळ तालुक्यात 21.10 टक्के मतदानाची नोंद झाली. त्यामुळे अत्यंत चुरशीने मतदान सुरू आहे. कोल्हापूर आणि हातकणंगलेमध्ये गेल्या काही वर्षांपासून सरासरी 70 टक्क्यांच्या आसपास मतदान होत आलं आहे. 


सकाळी 11 वाजेपर्यंत 11 लोकसभा मतदारसंघात किती मतदान?


➡️लातूर - 20.74 
➡️सांगली - 16.61
➡️बारामती - 14.64 
➡️हातकणंगले - 20.74
➡️कोल्हापूर -23.77
➡️माढा - 15.11
➡️उस्मानाबाद -17.06 
➡️रायगड - 17.18 
➡️रत्नागिरी -सिंधुदूर्ग- 21.19
➡️सातारा -18.94 
➡️सोलापूर -15.69


इतर महत्वाच्या बातम्या