कोल्हापूर : मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेनं येणाऱ्या कोयना एक्स्प्रेसखाली सापडून दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात उघडकीस आली. ही घटना शुक्रवारी रात्री घडली. या भीषण दुर्घटनेमध्ये दोन महिलांसह लहान मुलीचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा अपघात आहे की आत्महत्या याबाबत आता शाहूपुरी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे. रुळावरून चालत येत असताना ही घटना घडल्याची सुद्धा शक्यता आहे. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. त्यामुळे ओळख पटवण्याचे काम सुद्धा पोलिसांकडून सुरू आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या