Kolhapur News : शिवसेना बंडखोर आमदार समर्थक आणि कट्टर शिवसैनिक यांच्यात आता रस्त्यावरची लढाई सुरू झाली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले दिसून येत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील अपक्ष आमदार आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी बंडखोरी केल्यानंतर आता त्यांच्या मतदारसंघांमध्ये समर्थक एकटवले आहेत. आम्ही यड्रावकर म्हणून हजारो समर्थक त्यांच्या कार्यालयासमोर एकवटले आहेत.


हे सर्व समर्थक एकनाथ शिंदे यांच्या गटाला पाठिंबा देण्यासाठी एकवटले आहेत. या ठिकाणी शिवसैनिकांचा मोर्चा यड्रावकरांच्या कार्यालयासमोर येणार आहे. त्यामुळे शहरामध्ये यड्रावकरांच्या कार्यालयासमोर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात आतापर्यंत शिवसेना एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच माजी आमदार आणि राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आणि अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर शिंदे गटाच्या गळाला लागले आहेत. हे तिन्ही आमदार सध्या गुवाहाटीमध्ये आहेत. दरम्यान,  कोल्हापूर जिल्ह्यातील माजी शिवसेना आमदार कोणती भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे. यापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसैनिक एकवटले होते. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ मोर्चा काढला होता. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कट्टर शिवसैनिक आणि बंडखोर समर्थक असा संघर्ष नव्याने पाहायला मिळत आहे. 


महाविकास आघाडी सरकारचे काय होणार? जाणार की राहणार? एकनाथ शिंदे गटाचे काय होणार? या संदर्भात न्यायालयीन लढाई सुरू झाली असतानाच आता रस्त्यावरही लढाई सुरू झाली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या