Kolhapur Crime: कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातील वाढत्या चेन स्नॅचिग आणि घरफोडीच्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur) आंतरराज्य टोळीचा पदार्फाश केला आहे. या टोळीकडून तब्बल 36 गुन्हे उघडकीस आले आहेत. टोळीकडून 35 लाख 83 हजार 300 रुपये किंमतीची मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेकडून ही कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून नितेश उर्फ दिपू जगन्नाथ इफाळे (वय 37, रा. प्लॉट नं. 38 चंद्र माऊली कॉलनी, रूक्मिणीनगर, बेळगाव, ता.जि. बेळगाव), शुभम सुनिल सुर्यवंशी (वय 19, रा. आर.पी. डी. कॉलेज रोड, दुसऱ्या गेटजवळ, बेळगाव), त्यांचे साथीदार उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा (वय 35, रा. जमनटळ्ळी, ता. सकलेशपूर, जि. हासन), कृष्णा अशोक तलवार (रा. हुबळी, ता.धारवाड जि. बेळगाव) यांच्या मुसक्या आवळण्यात आले आहेत. 


कोल्हापुरातील लता पांडुरंग म्हातुगडे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन लंपास केल्यानंतर पोलिसांकडून तपास सुरु असताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला हा गुन्हा रेकॉर्डवरील गुन्हेगार दिपू जगन्नाथ डफाळेने व त्याच्या साथीदारांनी केल्याची माहिती मिळाली. हे आरोपी 4 मे रोजी पुन्हा चेन स्नॅचिंगसाठी कोल्हापुरात येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय महामार्गावर लक्ष्मी टेकडीजवळ सापळा रचण्यात आला. ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी खाक्या दाखवल्यानंतर कोल्हापुरातील चेन स्नॅचिंगची कबूली दिली. त्यानंतर अधिक चौकशी केली असता साथीदारांची नावे निष्पन्न झाली. 


एकूण 36 गुन्हे उघडकीस 


या आंतरराज्य टोळीकडून केलेल्या तपासामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 12 गुन्हे, कर्नाटक राज्यात 05 गुन्हे असे चेन स्नॅचिंगचे एकूण 17 गुन्हे, घरफोडीचे कोल्हापूर जिल्ह्यात 14 गुन्हे, सोलापूर जिल्ह्यात 01 गुन्हा व कर्नाटक राज्यात 02 गुन्हे असे घरफोडी चोरीचे एकूण 17 गुन्हे, बेकायदेशीर 9 mm पिस्टलचे 24 जिवंत राऊंड व एक मॅगझिन कब्जात बाळगल्याप्रकरणी 1 गुन्हा तसेच पल्सर मोटरसायकल चोरीचा 1 गुन्हा असे एकूण 36 गुन्हे उघडकीस आले आहेत. सदर आरोपींकडे अजूनही तपास सुरु असून त्यांचेकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने हस्तगत करणेची प्रक्रिया सुरु आहे. त्यांच्याकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे. 


आरोपी नितेश सिव्हील इंजिनिअर


आरोपी नितेश हा सिव्हील इंजिनिअरचे शिक्षण घेत असताना तो अमंली पदार्थांच्या आहारी गेल्याची माहिती समोर आली आहे.  त्याचा साथीदार शुभम सुनिल सुर्यवंशी, उमेश उर्फ लिंगराज रामेगौडा तसेच फेब्रुवारी 2023 मध्ये घरफोडी चोरीचे गुन्ह्यात अटकेतील आरोपी राजू सल्वराज तंगराज (रा.कारगल, ता. सागरा, जि. शिमोगा व  भिमगोंडा मारुती पाटील (रा. हलकर्णी, ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) या सर्वांनी मिळून चैनीसाठी चेन स्नॅचिंग, घरफोड्या केल्या आहेत. 


आरोपींवर जबरी गुन्हे दाखल


बेकायदेशीर हत्यार जवळ बाळगून लोकांचे अपहरण करुन त्याना मारहाण करणे, खुनाचा प्रयत्न करणे, घरफोडी चोरी मोटर सायकलवरून चेन स्नॅचिंगचे गुन्हे करणे यासह अंमली पदार्थाची बेकायदेशीर विक्री करून चैनी करणे हा त्यांचा  नित्यक्रम होता. यामधून या टोळीने महाराष्ट्रसह कर्नाटक व गोवा राज्यात गुन्हे केलेचे निदर्शनास आले. आरोपी उमेश रामेगौडा हा कर्नाटक राज्यातील खुन व खुनाचा प्रयत्न अशा दोन गुन्ह्यांमध्ये आरोपी आहे. तो कृष्णा अशोक तलवार या बनावट नावाने वावरत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या