Rankala lake : कोल्हापूरचा ऐतिहासिक वारसा आणि पर्यटनाचे वैभव असलेल्या रंकाळा तलावाची भिंत एका महिन्यात दुसऱ्यांदा ढासळल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यामध्येही रंकाळ्याच्या भिंतीला भगदाड पडले होते. आता रंकाळा उद्यानाच्या बाजूकडी व्यासपीठानजीकची भिंत कोसळली आहे.


त्यामुळे दुर्दैवावाची बाब म्हणजे पदपथ उद्यानातील या भिंतीला जागोजागी तडे गेले असून मोठी भगदाडे पडली गेली आहेत. त्यामुळे कोणतीही दुर्घटना होऊन जिवितहानी होण्याची वाट न पाहता या ठिकाणी पडझड झालेल्या भिंतीची डागडूजी करण्याची गरज व्यक्त होत आहे.


साधारण आठ ते दहा वर्षांपूर्वी संपूर्ण रंकाळ्यात दुषित पाणी येऊन मिसळल्याने केंदाळाचे साम्राज्य होते. त्यामुळे हे केंदाळ बाहेर काढण्यासाठी भिंत पाडून कार्यवाही करण्यात आली होती. त्यानंतर केंदाळ काढण्याची प्रक्रिया पार पाडल्यानंतर ही भिंत बांधण्यात आली होती.  मात्र, सुमार दर्जाच्या बांधकामामुळे ही भिंत काही वर्षांमध्ये ढासळली गेली. शालिनी पॅलेस समोरील भिंतही कोसळली आहे. त्यामुळे जागोजागी भिंतीला तडे जाऊन कोसळली आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या