Gokul : कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाकडून (गोकुळ) निवडक गावांमध्ये बायोगॅस प्लँट व द्रवरूप शेणखत प्रकल्प उभारण्यात येणार आहे. याबाबतची माहिती गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष विश्‍वास पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. उद्या प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्पाचे उद्‌घाटन माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ व सतेज पाटील यांच्या हस्ते होणार आहे. गडमुडशिंगी येथील संघाच्या पशुखाद्य कारखान्यात हा कार्यक्रम होणार आहे. 


या प्रकल्पासाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड तसेच टाटा ट्रस्टच्या सस्टेन प्लस एनर्जी फौंडेशनच्या सहकार्याने हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे. फौंडेशनकडून आलेले 120 प्लेक्सी बायोग प्लँट 50 टक्के अनुदानावर निवड झालेल्या गावांमध्ये महिला दूध उत्पादकांना देण्यात आले आहेत. द्रवरूप शेणखत प्रकल्पासाठी लागणारी प्रयोगशाळेकडील उपकरणे, स्लरी गोळा करण्यासाठी टँकर आदी साहित्य फौंडेशनकडून मिळालेल्या अर्थसहाय्यातून खरेदी करण्यात येणार आहेत. 


या प्रकल्पातून 80 ते 100 लिटर मिळणारे द्रवरूप शेणखत शेतीसाठी वापरता येणार आहे. या प्रकल्पातून शिल्लक राहिलेले द्रवरूप शेणखत तिच्या गुणवत्तेनुसार 25 पैसे ते दोन रुपये लिटर दराने ‘गोकुळ’ खरेदी करणार आहे. प्रकल्पांतर्गत गोकुळकडून प्रतिदिन पाच टन क्षमतेचा द्रवरूप शेणखत प्रकल्प पशुखाद्य कारखान्यात उभारण्यात येईल. यामध्ये शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या द्रवरूप शेणखतावर प्रक्रिया करून त्यापासून ‘फॉस्फ-प्रो’ या फॉस्परयुक्त सेंद्रीय खताची निर्मिती करण्यात येईल. हे सेंद्रीय खत डीएपीसाठी उत्तम पर्याय असल्याची माहिती अध्यक्षांनी दिली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या