Panhala Fort landslide : गेल्या दोन तीन पन्हाळगडावर अतिवृष्टीने दरडी कोसळण्याचा प्रकार सुरुच आहे. त्यामुळे ऐतिहासिक किल्ल्यांच्या पायथ्याशी वास्तव्य असलेल्या गावांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेनंतर विशेष करून नेबापूरचे ग्रामस्थ चिंतेत आहेत. आज पुन्हा सकाळी गडाच्या चार दरवाजा खालील बाजून दरड कोसळली आहे.  विशेष म्हणजे, गडावरी नाक्यानजीक गतवर्षी रस्ता खचला होता, त्याच्याच उजव्या बाजूला दरड कोसळली आहे. 


दरडी कोसळताना प्रसंग कॅमेऱ्यात कैद झाला आहे. त्यामुळे पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्यावर्षी मुख्य रस्ता खचल्याने कठडा बांधण्यात आला होता. मात्र, तेथील आता दरड कोसळल्याने त्या कठड्यालाही धोका निर्माण झाला आहे.  कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये कालपासून मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून धुवाँधार पाऊस होत आहे. त्यामुळे या अतिवृष्टीमुळे पन्हाळगडच्या तटबंदीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे.