kolhapur News : प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहणाचा समारंभ 26 जानेवारी रोजी सकाळी 9.15 वाजता छत्रपती शाहू स्टेडियमवर पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते होणार आहे. 26 जानेवारी रोजी ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय समारंभ राज्यभर एकाच वेळी म्हणजे सकाळी 9.15 वाजता करण्यात येणार आहे. सकाळी 8.30 ते 10 च्या दरम्यान ध्वजारोहणाचा किंवा इतर  कोणताही शासकीय किंवा अर्धशासकीय समारंभ साजरा करण्यात येवू नये. जर एखाद्या कार्यालयास अथवा संस्थेला आपला स्वत:चा ध्वजारोहण समारंभ साजरा करावयाचा असल्यास त्यांनी तो समारंभ सकाळी 8.30 वाजण्याच्या पूर्वी किंवा 10 वाजल्यानंतर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.


ज्या ठिकाणी दरवर्षी  प्रजासत्ताक दिनी राष्ट्रध्वज उभारला जातो,  अशा सर्व शासकीय व सार्वजनिक इमारतींवर, किल्ल्यांवर तसेच ऐतिहासिक महत्वाच्या ठिकाणी राष्ट्रध्वज उभारण्यात यावेत. प्रजासत्ताक दिनानिमित्त प्लास्टिकचे ध्वज वापरु नयेत, असे आवाहनही कवितके यांनी केले आहे.


राष्ट्रध्वजासाठी प्लॅस्टिकचा वापर करु नये


दरम्यान, राष्ट्रध्वजाचा योग्य तो मान राखला जावा तसेच त्याचा अवमान होऊ नये. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी प्लॅस्टिकचा राष्ट्रध्वजासाठी वापर होणार नाही याबाबत योग्य ती दक्षता घ्यावी, असेही आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी केले आहे.


स्थानिक पातळीवर नागरिकांनी तसेच जिल्हा, तालुका, ग्रामपंचायत, मंडळे, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, आरोग्य संस्था अशा शासकीय-निमशासकीय यंत्रणा तसेच सामाजिक अशासकीय संस्था व स्थानिक पोलीस यंत्रणा यांना प्लॅस्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर होणार नाही व अशा प्रकारांना पायबंद बसेल याची काळजी घेण्याचे आवाहन कवितके यांनी केले आहे.


काही वेळा राष्ट्रीय कार्यक्रमावेळी तसेच विशेष कला, क्रीडा प्रसंगी वैयक्तिकरित्या वापरण्यात येणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्तत: टाकण्यात आल्याचे दिसून येते. रस्त्यात पडलेले व विखुरलेले राष्ट्रध्वज प्लॉस्टिकचे असतील तर बरेच दिवस नष्ट होत नसल्याने ते त्याच ठिकाणी पडलेले आढळतात. ही बाब राष्ट्र प्रतिष्ठेच्या दृष्टीने गंभीर असल्याने राष्ट्र ध्वजाककरिता प्लॉस्टिकच्या वापरास मान्यता नाही. कागदी ध्वजाचा वापर करताना योग्य तो मान राखणे आवश्यक आहे. असे राष्ट्रध्वज रस्त्यावर व अन्य ठिकाणी फेकून देवू नये. ते खराब झाले असल्यास ते ध्वजसंहितेतील तरतुदीनुसार नष्ट करण्यात यावेत, असे आवाहनही निवासी उपजिल्हाधिकारी कवितके यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या