Panhala Fort landslide : महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ले पन्हाळगडला लागलेली घरघर कायम आहे. आता पन्हाळा येथील प्रवेशद्वारावर असणारे सादोबा तळ्याच्या भिंतीचा पूर्ण भाग कोसळला आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे.
दरम्यान, सादोबा तलावाच्या चारही बाजूच्या संरक्षक भिंतींना फुगवटा आला आहे. त्यामुळे या भिंतीही संकटात आहेत. गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे तळ्याच्या पश्चिमेकडील भिंतीचा पुढील भाग ढासळला होता. जकात नाका असणाऱ्या भागात देखील भिंत पडली होती. आधाराची भिंत ढासळल्याने दफनभूमीचा भराव देखील कधीही खाली येण्याची शक्यता आहे. तसेच तलावच्या बाजूने जाण्याच्या रस्त्यावरही भिंतींना तडे गेले आहेत. तलावच्या ज्या भिंती कोसळत आहेत, त्याचे दगड पाण्यातच पडत आहेत.
ऑगस्ट महिन्यातही दरड कोसळली
गेल्या महिन्यात 8 ऑगस्ट रोजी गडाच्या चार दरवाजाच्या खालील बाजूने दरड कोसळली होती. विशेष म्हणजे, गडावरील नाक्यानजीक गतवर्षी रस्ता खचला होता, त्याच्याच उजव्या बाजूला दरड कोसळली होती. त्यामुळे पायथ्याशी राहणाऱ्या ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण आहे. गेल्यावर्षी मुख्य रस्ता खचल्याने कठडा बांधण्यात आला होता. मात्र, तेथील आता दरड कोसळल्याने त्या कठड्यालाही धोका निर्माण झाला आहे. अतिवृष्टीमुळे पन्हाळगडच्या तटबंदीवर विपरित परिणाम होऊ लागला आहे.
इतर महत्वाच्या बातम्या