Ambabai Mandir : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष व पोलिसांच्या सहकार्याने चोरी करणाऱ्यांना महिन्यात दुसऱ्यांदा रंगेहाथ पकडण्यात यश आले. अंबाबाई मंदिरात शनिवारी दोन महिला चोरीचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही नियंत्रण कक्षात निदर्शनास आल्यानंतर ताब्यात घेण्यात आले. 


दोन महिला चोरीचा प्रयत्न करत असताना सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष येथे निदर्शनास येताच भक्तांच्या तक्रारीनुसार पाहणी केली असता दोन महिला चोरी करताना निदर्शनास आल्या. देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांच्या सतर्कतेने व पोलिसांच्या मदतीने सदर महिलांना तत्काळ रंगेहाथ मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले.


अवघ्या दहा मिनिटांत या गुन्ह्याचा उलगडा करण्यात आला. यामध्ये पोलीस निरीक्षक दत्तात्रय नाळे, मंदिर पोलिस इन्चार्ज राजेंद्र कांबळे, महिला पोलिस सहाय्यक फौजदार नंदिनी मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल देवानंद बल्लारी, देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष विभाग प्रमुख राहुल जगताप, अभिजित पाटील, अवधूत चौगुले, अनिकेत बागल व सेक्युरिटी रोहित आवळे, गोसावी यांच्या सहाय्याने सदर गुन्हा उलघडण्यात मदत झाली.


देवस्थान समितीच्या तिसऱ्या डोळ्याची सदैव साथ! 


मंदिर परिसरात महिन्याभरात देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्षाच्या सतर्कतेने महिन्याभरात दोन गुन्हे उघडकीस आले आहेत. यापूर्वी 26 सप्टेंबर रोजी मौल्यवान वस्तूसह पाकिटावर डल्ला मारणाऱ्या सोलापूर येथील एका सराईत महिलेला जुना राजवाडा पोलीस आणि देवस्थान समितीच्या सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष अधिकारी व सुरक्षारक्षकांनी सापळा रचून पकडले होते. 


सविता गोविंद अवतळे (वय 36, रा. आष्टा कासार, जि. सोलापूर) असे या महिलेचे नाव आहे. महिलेकडून ताब्यात घेतलेल्या पर्समध्ये सात हजार रुपयांची रक्कम आढळून आली आहे. त्यामुळे पोलिस विभाग व देवस्थान सीसीटीव्ही नियंत्रण कक्ष यांचे सतर्कतेने चोऱ्यांना चांगलाच आळा बसत चालला आहे. काहीवेळा मंदिरात गर्दी लक्षात लहान मुलं किंवा वृद्ध नचरचुकीने गर्दीत हरवल्याची घटना घडतात. त्यामुळे तत्काळ अत्याधुनिक स्पीकरवर याबाबत सांगून नातेवाईकांना भेट घडवून देण्यात यश प्राप्त झाले आहे. सावधानता म्हणून अनोळखी व्यक्ती व अनोळखी वस्तू या बाबत सूचना देण्यात येतात. 


इतर महत्वाच्या बातम्या