Kolhapur News : उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केलेली युती अधिक मजबूत करण्यासह निवडणुकीची रणनितीही आखली जाणार आहे, कार्यकर्त्यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शाखा स्थापन करतानाच घराघरात कार्यकर्ता तयार करावा, असे आवाहन ब्रिगेडचे महासचिव सौरभ खेडेकर यांनी केले.


कोल्हापूर संभाजी ब्रिगेड आयोजित कार्यकर्ता संवाद मेळाव्यात सौरभ खेडेकर यांनी बोलताना कानमंत्र दिला. खेडेकर पुढे म्हणाले, संभाजी ब्रिगेडने राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाह आमदार, खासदारकीच्या निवडणुका लढवण्याचे पक्के केले आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत केलेली युती अधिक मजबूत करण्यासह निवडणुकीची रणनीती आखली जाणार आहे. 


तत्पूर्वी, कोल्हापूर संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष रुपेश पाटील यांनी कामाचा आढावा घेत मेळावा आयोजनामागील उद्देश सांगितला. रुपेश पाटील म्हणाले,  ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांकडून दूध मापनात पाप केलं जात असल्याचे समाजाला दाखवून दिले आहे. त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी बांधव ब्रिगेडशी जोडले गेले आहते. सहाजिकच ब्रिगेडची ताकदही शेतकरी बांधवांमुळे वाढत चालली आहे. तसेच सर्वसामान्यांच्या प्रश्नांसह तरुण तरुणींचे प्रश्न घेऊन संघटन बांधणी केली जाईल. व्यवस्थेविरुद्धही लढा दिला जाईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी झोकून देऊन ब्रिगेडचा उद्देश सफल करावा. 


संभाजी ब्रिगेडचे सहसंघटक आणि पश्चिम महाराष्ट्र पदवीधर मतदारसंघाचे अध्यक्ष मनोज गायकवाड यांनीही यावेळी मनोगत व्यक्त केले. महाराष्ट्रभर युवा विचारांचा वनवा पेटवताना ठाकरेंच्या शिवसेनेसोबत समाजाभिमुख सत्ता मिळवण्यासाठी सर्वांनी खांद्याला खांदा लावून जनमाणसांमध्ये जावे. करवीरनगरीत युवकांची मोठ बांधून संभाजी ब्रिगेडचे विचार व कार्य घराघरात न्यावेत. 


ब्रिगेडचे कोल्हापूर सांगली जिल्हा संपर्क प्रमुख दिनेश जगदाळे यांनी ज्यांना जिल्हा शाखेमध्ये यायचं आहे त्यांनी पदाधिकाऱ्यांच्या भेटी घ्याव्यात. या भेटीसाठी येताना सोबत ब्रिगेडच्या माध्यमातून कोणकोणते कार्य हाती घेतले जावे याची छोटीशी टिप्पणीही आणावी. या मेळाव्याला ब्रिगेडच्या महिला आघाडीच्या शहराध्यक्षा माधुरी भोसले, योगेश जगदाळे, साताप्पा अस्वले, अमर पाटील, अभिजीत भोसले, बाळासाहेब भोसले व विक्रमसिंह घोरपडे उपस्थित होते. 


इतर महत्वाच्या बातम्या