कोल्हापूर : जिल्ह्यातील पट्टणकोडोली येथील फरांडेबाबा यांची भाकणूक आज पार पडली. यामध्ये फरांडे बाबांनी येत्या वर्षाभरात काय होणार याचा दर वर्षी प्रमाणे यंदाही अंदाज वर्तवला आहे. यात त्यांनी राजकारणात गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल अशी भाकणूक केली आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यातील पट्टणकोडो येथे दवर्षी विठ्ठल बिरदेव यात्रा पार पडते.  या यात्रेला  महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्रप्रदेश, गोवा, उत्तर प्रदेश येथून भविक हजेरी लावत असतात. गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे ही यात्रा   गावपातळीवर पुजारी व मानकरी यांच्या उपस्थितीत मोजक्याच भाविकांच्या उपस्थितीत पार पडली होती. परंतु, यंदा कोरोना मराहमारीचे संकट थोडे ओसरल्यामुळे यंदा भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आहे. हजारो भाविकांच्या उपस्थितीत यांदा  फरांडे बाबांचा हेडाम व भाकणूक सोहळा पार पडला. यावेळी फरांडे बाबांनी पुढील वर्षभरातील अंदाज सांगितले. 


परंपरेनुसार आज सकाळी विधिवत कार्यक्रमांना सुरुवात झाली. प्रथम गावचावडीत मानाच्या तलवारीचे पूजन झाले. तलारीसह मानकरी आणि धनगर समाजाचे पंच मंडळींनी फरांडेबाबांची भेट घेतली.  


पट्टणकोडोली फरांडेबाबा यांची भाकणूक


पर्जन्य :  मेघराजा गैरहंगामी बरसेल


धारण : दोन, सव्वा दोन, तीन असेच वाढत जाऊन महागाईचा आगडोंब उसळेल


राजकारण : राजकारणात गोंधळ होऊन प्रचंड उलथापालथ होईल


भूमाता : देशात नदी जोड प्रकल्प उदयास येईल,  पूर्वोत्तर राज्यातही समान नागरी कायद्याकडे वाटचाल होईल


बळीराजा : बळीराजाच खरा राजा होईल


सीमावाद : सीमेवरून अनेक देशात युद्धजन्य परिस्थिती निर्माण होईल


महासत्ता : भारत महासत्तेच्या दिशेनं जाऊन जागतिक नेतृत्वात वेग घेईल


हितसंबंध : बहीण भावात मालमत्तेवरून तंटे होतील


कांबळा :  देव मेंडका होऊन निष्ठावान सेवक आणि मेंढीमाऊलीचा रक्षक बनेल