Kolhapur Municipal Corporation : कोल्हापूर शहर पाणी पुरवठा विभागामार्फत पाणीपट्टी विशेष वसुली धडक मोहिमेंतर्गत शहरातील थकबाकीदारांच्याकडून 24 लाख 77 हजार 104 थकबाकी वसूल करण्यात आली. तसेच थकबाकी भरणा न भरलेल्या 13 थकबाकीदारांची नळ कनेक्शन खंडीत करण्यात आली आहे. 


यामध्ये शास्त्री नगर, सम्राटनगर, जागृतीनगर, नलवडे कॉलनी, सीपीआर हॉस्पीटल (शासकीय) या भागात फिरती करुन रोख रक्कम रु.20 लाख 46 हजार 205 तर गणेशनगर, कंजारपाट वस्ती, शिंगणापुर रोड,फुलेवाडी रिंगरोड परिसरात फिरती करुन रोख रक्कम रु. 1 लाख 57 हजार 381 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली. त्याचबरोबर लक्ष्मीपुरी, मटण मार्केट,बिंदु चौक या भागात फिरती करुन रोख रक्कम रु 1 लाख 60 हजार 708 इतकी व सदर बाझार येथे फिरती करुन रोख रक्कम रु. 1 लाख 12 हजार 810 इतकी थकीत रक्कम वसुल करण्यात आली.


सदरची कारवाई प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई व जल अभियंता हर्षजित घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पाणीपटटी अधिक्षक प्रशांत पंडत, वसुली पथक प्रमुख, मिटर रिडर व फिटर यांनी केली. पाणी पुरवठा विभागाची वसुली मोहिम येथून पुढेही सुरु राहणार असलेने शहरातील व ग्रामीण भागातील सर्व थकबाकीदारांवर कारवाई करण्यात येणार असून थकबाकीदारांनी आपली थकीत पाणी बिलाची रक्कम त्वरित भरुन कनेक्शन बंद करणे, मिळकतीवर बोजा नोंद करणे यासारखे कटू प्रसंग टाळावेत असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


नगररचना विभागाकडून आयोजित दोनदिवसीय विशेष कॅम्पमध्ये 108 बांधकाम परवानग्या


दरम्यान, नगररचना विभागामार्फत आयोजित दोनदिवसीय विशेष कॅम्पमध्ये 108 बांधकाम परवानग्या देण्यात आल्या. शुक्रवारी कॅम्पमध्ये 46 बांधकाम परवानग्या, 17 भोगवटा प्रमाणपत्र, 8 विभाजन, 6 बांधकाम परवानगींना मुदतवाढ व 9 अनामत रक्कम परत देण्यात आल्या. या कॅम्पमध्ये भोगवटा प्रमाणपत्र, बांधकाम परवानगी, जोता चेकिंग, अनामत रक्कम मागणी अर्ज, ले आऊट मंजूरी, एकत्रीकरण व विभाजनबाबतची प्रकरणे मंजूर करण्यात आली. महानगरपालिका क्षेत्रातील ऑनलाईन पुर्वी दाखल झालेल्या विकास परवानगी (इमारत बांधकाम व भोगवटा) कामी नगररचना विभागामार्फत दोन दिवसाचे विशेष कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.


या कॅम्पमध्ये 1000 चौ.मी. भूखंड क्षेत्रापर्यंतची विकास प्रकरणे घेण्यात आली. नगररचना विभागामार्फत दोन दिवसात 108 बांधकाम परवानग्या, 34 भोगवटा प्रमाणपत्र, 16 विभाजन, 8 बांधकाम परवानगींना मुदतवाढ व 12 अनामत रक्कम परत करण्यात आल्या. या कॅम्पमध्ये सहाय्यक संचालक नगररचना रामचंद्र महाजन, उपशहर रचनाकार रमेश मस्कर व कनिष्ठ अभियंता यांनी दाखल झालेली प्रकरणे तपासून मंजूर केली. या कॅम्पला नागरिक व आर्किटेक्चर यांचेकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या