MLA P N Patil ED Notice : कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील (Kagal Taluka) सेनापती कापशीमधील सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि गडहिंग्लज तालुक्यातील अप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना (गोडसाखर) कर्जपुरवठा प्रकरणी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर (KDCC ED Raid) ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. या संदर्भात आतापर्यंत ईडीकडून जिल्हा बँकेचे अध्यक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी कामगार मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांच्यावर (Hasan Mushrif) तीनवेळा छापेमारी करण्यात आली आहे. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पाच अधिकाऱ्यांची सुद्धा चौकशी करण्यात आली आहे. तसेच तीन माजी संचालकांची चौकशी करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी. एन. पाटील सुद्धा ईडीच्या रडारवर आले आहेत.


पी. एन. पाटील हे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक असून ते आज स्वतःहून मुंबई येथील ईडी कार्यालयात दाखल झाले. मात्र, आज त्यांची चौकशी करण्यात आली नाही. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समाज बजावून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे. पी. एन. पाटील यांना यापूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये ईडीकडून समन्स जारी करण्यात आले होते. मात्र, ते चौकशीसाठी हजर झाले नव्हते.


त्यामुळे आज कार्यालयात येऊनही त्यांची चौकशी होऊ शकली नाही. त्यांना आता आठवडाभरात नव्याने समन्स पाठवून चौकशीसाठी बोलावलं जाणार आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील आता आणखी एका मोठ्या नेत्याची चौकशी या अनुषंगाने होत आहे. यापूर्वी मुश्रीफ अडचणीत आले आहेत. त्यांच्या विरोधात मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांना आज (5 एप्रिल) न्यायालयातून दिलासा मिळतो की नाही? याकडे लक्ष लागून राहिलं आहे. त्यांनी अटकपूर्व जामीनासाठी मुंबई येथील विशेष न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याची सुनावणी पूर्ण झाली असून विशेष न्यायालयाने निर्णय राखून ठेवला होता. त्यामुळे त्यांना दिलासा मिळणार की नाही? याकडे कोल्हापूर जिल्ह्यासह राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


केडीसीसीच्या इतिहासात चालू वर्षात सर्वाधिक नफा


दरम्यान, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (KDCC Bank) इतिहासात चालू वर्षात सर्वाधिक नफा झाल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी दिली आहे. मुश्रीफ केडीसीसी बँकेचे अध्यक्ष आहेत. मुश्रीफ यांनी आर्थिक वर्षाची समाप्ती 31 मार्चला झाल्याने आज बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्हा बँकेच्या इतिहासात सर्वात जास्त नफा यावर्षी झाला आहे. ठेवीदारांना विनंती ठेवी कोणत्याही बँकेत ठेवा, पण वाढीव पैशाच्या हव्यासापोटी फसवणूक करू घेऊ नका. चेन मार्केटिंगमध्ये पैसे गुंतवू नका. ईडीचा छापा पडल्यानंतर देखील ठेवीदारांनी विश्वास ठेवला. दोन ते अडीच महिने अनेक अफवा पसरल्या होत्या, पण ठेवीदार, बँकेचे कर्मचारी यांनी विश्वास दाखवला यासाठी त्याचे आभार मानतो.


महत्वाच्या इतर बातम्या : 


Hasan Mushrif : आमदार हसन मुश्रीफ यांना दिलासा की झटका? अटकपूर्व जामीनावर आज फैसला, विशेष न्यायालयाच्या निर्णयाकडे लक्ष