कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान सात मे रोजी पार पडणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होणार आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा मतदारसंघांचा समावेश आहे. मतदानाच्या पार्श्वभूमीवर लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र आदमापूर बाळूमामा मंदिर या दिवशी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सात आणि आठ मे रोजी अमावस्या असल्याने लाखो भाविक दर्शनाला मंदिरामध्ये गर्दी करत असतात. त्यामुळे मतदानावर कोणताही परिणाम होऊ नये, यासाठी मंदिरच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सातारा, बारामती, सोलापुरात 7 मे रोजी मतदान; 12 एप्रिलपासून रणधुमाळी" />
लोकसभा निवडणुकीच्या दोन्ही टप्प्यात मतदान तुलनेत कमी झाल्याने निवडणूक आयोगासह राजकीय पक्षांची सुद्धा चिंता वाढली आहे. त्यामुळे मतदान वाढवण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु आहेत.
ज्येष्ठ व दिव्यांगांच्या होम व्होटिंगला सुरुवात
दरम्यान, लोकसभेसाठी कोल्हापूर व हातकणंगले या दोन्ही मतदारसंघांमध्ये 1मेपासून ज्येष्ठ व दिव्यांगांच्या होम व्होटिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या दोन दिवसांत कोल्हापूर मतदारसंघात 2 हजार 740 तर हातकणंगले मतदारसंघासाठी 561 नागरिकांनी टपाली मतदानाद्वारे मतदानाचा हक्क बजावला आहे. आज (3 मे) ज्येष्ठ व दिव्यांगांच्या टपाली मतदानाचा अखेरचा दिवस आहे.
जिल्ह्यातील कोल्हापूर व हातकणंगले मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. वयाच्या 85 वर्षांवरील ज्या ज्येष्ठांना तसेच 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांगत्व असलेल्या दिव्यांग व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत येता येणार नाही, त्यांच्यासाठी यंदा पहिल्यांदाच घरून टपाली मतदानाची सोय करण्यात आली आहे. त्यासाठी 3 हजार 743 ज्येष्ठ व दिव्यांगांनी 12 डी अर्ज भरून घरून मतदानाची मागणी केली होती. त्यानुसार विधानसभा मतदारसंघनिहाय पथकाची स्थापना करण्यात आली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या