Satej Patil, Kolhapur : कोल्हापूर उत्तरच्या काँग्रेस उमेदवार मधुरिमाराजे यांनी ऐनवेळी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर माजी मंत्री सतेज पाटील यांच्यावर नामुष्की आली आहे. दरम्यान, आज दुपारी झालेल्या सर्व प्रकारानंतर सतेज पाटील यांच्या अजिंक्यतारा कार्यालयावर कार्यकर्त्यांनी गराडा घातलाय. कार्यकर्त्यांशी बोलताना सतेज पाटलांना अश्रू अनावर झाले आहेत. 


सतेज पाटील काय काय म्हणाले? 


सतेज पाटील म्हणाले, काल दुपारपासून माझी कोणाशी भेट होऊ शकली नव्हती. हे सगळं घडल्यावर भुदरगडमध्ये  राहुल देसाईंचा काँग्रेस प्रवेश होता. गेले पाच ते सहा महिने मी त्यांना काँग्रेसमध्ये या म्हणून सांगत होतो. त्यांनी 5 ते 6 हजार लोकांचा मेळावा बोलावला होता. मी त्याठिकाणी न जाऊन त्यांचं खच्चीकरण करणे बरोबर नव्हते. त्यामुळे मी दुपारी घटना घडल्यानंतर त्याठिकाणी गेलो. जे काही घडलं ते तुमच्या सर्वांच्या समोर आहे. मी त्याच्यावर काही टीका टिप्पणी करणार नाही. जे घडलं आहे, त्याला सामोरे जाण्याचे सामर्थ्य तुम्ही मला द्यावं, अशी माझी विनंती आहे. कारण अनेक संकट माझ्या आयुष्यात आली आहेत. 


पुढे बोलताना सतेज पाटील म्हणाले, पद, पैसा आणि प्रतिष्ठेपेक्षा तुमच्या सारखी माणसं माझ्यासाठी महत्त्वाची आहेत. आज देखील या प्रसंगाला सामोरे जाताना धाडस होतं नाही. मला 2 वाजून 36 मिनीटांनी मालोजीराजेंचा फोन आला. त्यांनी सांगितलं की, माघार घेणार आहे. मी म्हटलं असा निर्णय घेऊ नका. कारण एक उमेदवारी बदलून दुसरी उमेदवारी काँग्रेस पक्षाने माझ्यासारख्या नेत्यावर विश्वास ठेऊन दिली आहे. मी म्हणालो, काहीही संकट असू द्या, असा निर्णय घेऊ नका. शेवटी ज्यावेळी निवडणूक लागते, त्यावेळी ताकदीने निवडणुकीत उतरत असतो. तुम्हाला विश्वास देतो, कसलीही काळजी करु नका. तुम्हाला काही झालं तर जबाबदार बंटी पाटील असेल. त्यानंतर मी फोन बंद केला आणि ताबडतोब कलेक्टर ऑफिसला गेलो. तिथून पुढचा व्हिडीओ आपल्याकडे आलेला आहे. ती स्थिती माझ्या हातात नव्हती. मला अनावर आलं होतं. काय घडतंय मलाच समजत नव्हतं. त्यांचा हात धरुन थांबवणे मलाच संयुक्तिक वाटत नव्हतं. जे घडलं ते लोकांसमोर होतं. माझ्या हातून एखादं वाक्य जाऊ नये म्हणून लोकांना गाडीत बसायला सांगितलं. मला त्यांनी निर्णय का घेतला माहिती नाही. 8 वाजता कसबा बावड्यात बैठक होती. सगळं घडल्यानंतर सुद्धा या गोष्टी घडल्या, याचं माझ्याकडे उत्तर नव्हतं. का घडलं ? हे मला माहिती नाही. मी त्यांच्यावर टीका करणार नाही. त्यांनी निर्णय घेतला, त्यात बदल होऊ शकतं नाही.




इतर महत्त्वाच्या बातम्या


Narayan Rane : आम्ही सकाळी इकडे, संध्याकाळी तिकडे नाही, माहीममध्ये महायुतीच्या सदा सरवणकरांना पाठिंबा : नारायण राणे