Vidhan Parishad Election 2022 : भाजपमध्ये (BJP) सर्व काही आलबेल आहे अस समजू नये असा टोला गृह राज्यमंत्री सतेज पाटील (satej patil on vidhan parishad election) यांनी भाजपला लगावला आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार विधानपरिषदेच्या निवडणुकीत (vidhan parishad election 2022) निवडून येतील. मागील निवडणुकीतून आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे यावेळी गाफील नसल्याचेही सतेज पाटील यांनी सांगितले.  


काँग्रेस आमदारांनी (Congress MLA) मुंबईत एकत्र करण्यात येणार असून त्या सर्व आमदारांना मतदानाचा कोटा आणि कोणत्या पद्धतीने मतदान प्रक्रिया असते याबाबत माहिती दिली जाईल, आज उद्या काँग्रेस आमदार मुंबईत एकत्रित होतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.


महाविकास आघाडीमध्ये (MVA) समन्वय नसल्यावरून ते म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये समन्वय नव्हता अस म्हणणं चुकीचं आहे. आत गेल्यानंतर काय झालं हे काही पाहता येत नाही. मात्र पक्षाच्या 150 आमदारांनी पक्ष प्रतोदांना दाखवून मतदान केले. त्यामुळे काहीच अडचण नव्हती, पण मत दाखवायची नसतात  त्या ठिकाणी मते दाखवली गेल्याने घोळ झाला.
 
सतेज पाटील यांनी भाजपला टोला लगावला. भाजपमध्ये प्रचंड नाराजी आहे. प्रत्येक जिल्ह्यामध्ये नाराजी आहे. पंकजा मुंडे यांना भाजपमध्ये न्याय मिळू शकलेला नाही. प्रत्येक जिल्ह्यातील नाराजी आहे ती त्यांना मतदानामध्ये दिसेल. अनेकांना विधानपरिषदेची उमेदवारी देतो म्हणून पक्षात प्रवेश दिला होता. आता त्यांची काय अवस्था आहे हे पाहत आहोत. त्यामुळे भाजपने सर्व काही आलबेल आहे असे समजू नये, त्यांच्यामध्येही अडचणी प्रचंड आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या