Kolhapur Rain update : गेल्या तीन वर्षांपासून महापुराचे रौद्ररुप पाहणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. मान्सूनपूर्व जोरदार पावसाच्या सरींनी बळीराजांनी आनंदाने पेरणी करून घेतली होती. मात्र, त्यानंतर हुकमी असा पाऊस पडलाच नसल्याने चिंता दिवसागणिक वाढत चालली आहे. पावसाने अशीच दडी मारल्यास जिल्ह्यावर दोबार पेरणीचे संकट ओढावणार आहे.
पावसाचे आगार समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा, राधानगरी, भुदरगड आणि गगनबावडा तालुक्यातही पावसाने दडी मारली आहे. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये गेल्यावर्षीच्या तुलनेत अत्यल्प पाऊस झाला आहे. त्यामुळे सर्वांचेच पावसाकडे डोळे लागले आहेत. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून महापूर पाहणाऱ्या नद्याही पावसाची वाट पाहू लागल्या आहेत. आतापर्यंत (15 जून) गेल्यावर्षीच्या तुलनेत तब्बल 36 टक्के पाऊस कमी झाला आहे.
कोल्हापूर शहर
- मागील चोवीस तासातील पाऊस- 0 एमएम
- 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस-78 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस 46 एमएम
जून महिन्यातील तालुकानिहाय सरासरी पाऊस (मिमी)
तालुका | सरासरी | 2022 | 2021 |
हातकणंगले | 58 | 18 | 48 |
शिरोळ | 51 | 20 | 70 |
पन्हाळा | 155 | 27 | 71 |
शाहूवाडी | 177 | 47 | 134 |
राधानगरी | 332 | 16 | 97 |
गगनबावडा | 535 | 53 | 343 |
करवीर | 91 | 37 | 63 |
भुदरगड | 169 | 34 | 80 |
कागल | 63 | 22 | 76 |
गडहिंग्लज | 93 | 25 | 121 |
आजरा | 195 | 27 | 113 |
चंदगड | 284 | 42 | 142 |
15 जून सकाळी 8 पर्यंत जिल्ह्यातील प्रमुख धरणांची पाण्याची पातळी
राधानगरी (भोगावती) 8.36 टीएमसी
- मागील वर्षी आज रोजी - 1.60 टीएमसी (19 टक्के)
- आज रोजी- 2.41 टीएमसी (29 टक्के )
- पाण्याचा विसर्ग- 300.0 क्यूसेक
- मागील चोवीस तासातील पाऊस- 0 एमएम
- 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस- 22 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-106 एमएम
काळम्मावाडी (दूधगंगा) 25.39 टीएमसी
- मागील वर्षी आज रोजी - 6.06 टीएमसी (23 टक्के)
- आज रोजी 6.52 टीएमसी (26 टक्के )
- पाण्याचा विसर्ग- 1050 क्यूसेक.
- मागील 24 तासातील पाऊस -3 एमएम
- 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस -39 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस -108 एमएम
पाटगाव (वेदगंगा) 3.71 टीएमसी
- मागील वर्षी आज रोजी - 1.09 टीएमसी (29%)
- आज रोजी- 1.11 टीएमसी (30%)
- पाण्याचा विसर्ग- 250 क्यूसेक.
- मागील चोवीस तासातील पाऊस-14 एमएम
- 1 जून 22 पासून आज पर्यंत पाऊस-155 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-567 एमएम
चिकोत्रा (चिकोत्रा) 1.52 टीएमसी
- मागील वर्षी आज रोजी - 0.52 टीएमसी (34 टक्के)
- आज रोजी- 0.74 टीएमसी (48टक्के)
- पाण्याचा विसर्ग- 0.0 क्यूसेक.
- मागील चोवीस तासातील पाऊस-0 एमएम
- 1 जून 22 पासून आज पर्यंत पाऊस-26 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस-20 एमएम
आंबेओहोळ 1.24 टीएमसी
- मागील वर्षी आज रोजी - 0.00 टीएमसी
- आज रोजी- 0.63 टीएमसी (51 टक्के)
- पाण्याचा विसर्ग- 0.00 क्यूसेक.
- मागील चोवीस तासातील पाऊस-0 एमएम
- 1 जून 22 पासून आजपर्यंत पाऊस-0 एमएम
- गतवर्षी आजपर्यंतचा पाऊस- 0 एमएम
इतर महत्त्वाच्या बातम्या