Sambhajiraje Chhatrapati, सोलापूर : "सर्वांना आपआपलं स्वातंत्र्य असतं. छत्रपती शाहू महाराज काँग्रेसमधून उभा राहिले. त्यावेळी स्वत: स्वराज्य उभं राहणार होतं. पण वडील आल्यानंतर माझा विषयच संपला. त्यांच्यासाठी मी त्यांच्यासाठी मी प्रामाणिकपणाने बाहेर पडलो. प्रामाणिकपणाने प्रचार केला, माझ्याइतका प्रचार केला. माझ्या एवढा प्रचार कोणीच केला नाही. जे काही मी केलं, त्यामध्ये मी समाधानी आहे. आता या दोन वेगळ्या भूमिका आहेत. पत्रकारांचं मतं आहे का की मी घरी बसावं? मी वेगळी भूमिका घेण्यासाठीच बाहेर पडलो आहे. वडिलांचा पक्ष वेगळा असेल मात्र माझी भूमिका वेगळी आहे. आम्ही शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचीच भूमिका आहे. आमच्या विचारांचा बेस क्लिअर आहे. काँग्रेसमध्ये मी फिट होत नसेल तर तिथे कसं मला घालून चालणार ? मी काँग्रेसमध्ये मिसफिट असेल तर तिथे राहू शकत नाही. मला सुद्धा स्वराज्यच्या माध्यमातून महाराष्ट्रभर पळायचं आहे", असं माजी खासदार संभाजीराजे छत्रपती म्हणाले. ते सोलापुरात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी गेले होते. त्यानंतर मनोज जरांगे आणि संभाजीराजे छत्रपती यांची पत्रकार परिषद पार पडली.
जरांगे यांची तब्बेत खराब असल्यानं भेट झाली नव्हती
संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आज सोलापुरला आलो होतो. जरांगे यांची तब्बेत खराब असल्यानं भेट झाली नव्हती. मात्र आज तब्बेतची विचारपूस आणि राजकीय चर्चा झाली आहे. त्यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी म्हणून मी त्यांना मोठा भाऊ म्हणून ताकीद दिली आहे. मी मनोजला 12 वर्षांपासून ओळखतो. सामान्य माणसाने कर्तृत्व उभे केले आहे. त्यांना नेहमी सहकार्य केले आहे. आमची चर्चा चांगली झाली आहे. मला त्यांचा अभिमान वाटतो, शेतकऱ्याच्या पोराने कर्तृत्व उभे केले आहे. त्याचे कौतुक आहे राजकीय चर्चा कायंय झाली हे सध्या सांगता येणार नाही, त्यांनी तब्बेतीची काळजी घ्यावी.
29 तारखेला ते भूमिका जाहीर करतील आत्ताच करू शकणार नाही
पुढे बोलताना संभाजीराजे छत्रपती म्हणाले, आमच्या मागण्या सारख्या आहेत म्हणून भेटायला आलेलो आहे. त्यांचं आणि सरकारच बोलण सुरू आहे. त्यामुळे सरकारने भूमिका मांडायला हवी. आजपर्यंत सरकारने दिलेलं आरक्षण 2 वेळा उडालं आहे. 10 टक्के आरक्षण टिकेल कसं हे सरकारनें सांगायला हवं. 3 तास आमची चर्चा झाली आहे. यावर चांगला पिच्चर निघेल. 29 तारखेला ते भूमिका जाहीर करतील आत्ताच करू शकणार नाही. जरांगे आमचेच आहेत. त्यामुळे त्यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. माझे वडील आले म्हणून मी बाजूला राहिलो मी त्यांचा प्रचार चांगला केला.वडिलांच्या विरुद्ध मी जाणारं नाही पण शिवरायांचे विचार मी सोडणार नाही. स्वराज्य पक्ष किती जागा लढवणार हे सध्या सांगता येणार नाही. 29 तारीख माझी नाही त्यांची आहे,ते माझ्याशिवाय कुणाशीही मनमोकळं बोलत नाहीत. जरांगे छत्रपती घराण्याचा सन्मान करतात. सगळ्या पक्षाच्या लोकांनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी. उपोषणाचा त्रास किती होतो हे आम्हाला माहित आहे मीही उपोषण केलेलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Sambhajiraje Chhatrapati : स्वराज्य पक्ष विधानसभा लढणार हे निश्चित, आमचे आणि मनोज जरांगेंचे ध्येय एकच : संभाजीराजे छत्रपती