कोल्हापूर फुटबाॅल : काही नव्या बदलांसह कोल्हापूर फुटबाॅल हंगामाचे वेध सुरु झाले आहेत. नव्या हंगामासाठी नव्या नियमांची सुद्धा घोषणा करण्यात आली आहे. फुटबॉलच्या नव्या हंगामात केएसए ‘ए’ डिव्हीजनसाठी संघ आणि खेळाडू नोंदणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. कोल्हापूर फुटबाॅलमध्ये परदेशी खेळाडू विशेष आकर्षण असले, तरी नव्या नियमावलीनुसार, परदेशी खेळाडूंची नोंदणी करता येणार नाही.  


ऑक्टोबरपासून नोंदणीस सुरुवात


फुटबाॅल हंगामासाठी ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात 16 वरिष्ठ गट ‘अ’ संघ आणि खेळाडू नोंदणीस सुरुवात होईल. यंदा परदेशी खेळाडूंना स्थानिक संघातून खेळता येणार नाही. याबाबतची मार्गदर्शक सूचना भारतीय फुटबाॅल महासंघाकडून देण्यात आल्या आहेत. 


काय आहे नवी नियमावली?



  • एका संघात 16 ते 20 खेळाडूंपर्यंत नोंदणी करता येईल 

  • जिल्ह्याबाहेरील भारतीय नागरिकत्व असणाऱ्या तीन खेळाडूंची नोंदणी करता येईल 

  • संघात 19 वर्षाखालील एक खेळाडू असणे बंधनकारक

  • बदली खेळाडू सुविधेत अ गटातील लीगचे सर्व सामने संपल्यानंतर नियमाप्रमाणे केएसए बी व सी डिव्हीजनमधील नोंदणीकृत खेळाडूंपैकी एकूण पाच खेळाडूंची नोंदणी करता येणार

  • जिल्ह्यातील नव्याने नोंदणी होणाऱ्या खेळाडूंसाठी रहिवास पुरावा म्हणून पाच वर्षांपूर्वी नाव नोंदणी असलेली रेशन कार्डची झेराॅक्स प्रत जोडणे अनिवार्य आहे.

  • बी डिव्हीजन लीगचे सर्व सामने संपल्यानंतर यातील खेळाडू ए डिव्हीजनमधील संघाना बदली खेळाडू सुविधेअंतर्गत घेता येणार आहेत.


प्रो-कबड्डीसाठी कोल्हापूरच्या चौघांची निवड


दरम्यान, प्रो-कबड्डीच्या दहाव्या हंगामासाठी कोल्हापूरच्या तेजस पाटील, ओंकार पाटील, आदित्य पोवार, दादासाहेब पुजारी या चौघांची विविध संघाकडून निवड झाली आहे. सडोलीमधील (ता. करवीर) तेजस पाटील सह्याद्री क्रीडा मंडळाचा खेळाडू आहे. त्याला सप्टेंबरमध्ये होणाऱ्या लिलावानंतर संघाचे नाव कळणार आहे. इचलकरंजी जयहिंद मंडळाचा आदित्य पोवार हा बंगळूरू बुल्स संघातून खेळणार आहे. शिंगणापूर जिल्हा परिषद शाळेचा ओंकार पाटीलची तेलगू टायटन, तर शिरोलीच्या जय शिवराय मंडळाचा दादासाहेब पुजारी यांची पुणेरी पलटण संघात निवड झाली. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :