Kolhapur Crime : कोल्हापूर शहरातून (Kolhapur Crime) पाचगावकडे जाणाऱ्या रस्त्यावर जगतापनगरच्या ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (वय 24, रा. गणेशनगर, चंबुखडी, शिंगणापूर) याचा निर्घृण खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या खुनानंतर पोलिसांनी शिताफीने तपास करताना चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि करवीर पोलिसांनी आज शुक्रवारी पहाटे मुख्य संशितासह चौघांना जेरबंद केले. 


दररम्यान, मारेकऱ्यांनी आर्थिक आणि पूर्ववैमनस्यातून ऋषिकेशचा खून झाला आहे. गणेश येलगट्टी, अथर्व हावल, वृषभ साळोखे आणि सोहम शेळके अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार गणेश येलगट्टी आणि ऋषिकेश यांच्यात आर्थिक कारणातून वैर निर्माण झाले होते. त्यामुळे दोघांमध्ये वादावादीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे गणेशकडून खुनाचा कट चरण्यात आला होता. दारु पिण्याच्या आमिषाने ऋषिकेशला जगतापनगर येथील मैदानावर त्यांनी बोलावून घेतले. त्यानंतर ऋषिकेशवर हल्ला करुन दगडाने ठेचून खून करण्यात आला. (Kolhapur Crime)


दरम्यान, मुलाचा खून झाल्यानंतर त्याची आई माधवी महादेव सूर्यवंशी यांनी करवीर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. यावेळी त्यांनी दोन संशयितांचा उल्लेख केला होता. ऋषिकेश व्हिनस कॉर्नर येथील व्हिडीओ पार्लरमध्ये नोकरी करत होता.


चेंडू आणण्यासाठी गेल्यानंतर मृतदेह आढळला 


दरम्यान, गुरुवारी (19 जानेवारी) सकाळी जगतापनगरामध्ये जोतिर्लिंग शाळेजवळील टर्फ मैदानाशेजारी मुले खेळत असताना चेंडू आणण्यासाठी गेले असताना मृतदेह दिसल्याने मुले घाबरली. पोलिसांना आधार कार्ड, मतदान ओळखपत्रावरुन तो ऋषिकेश महादेव सूर्यवंशी असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी पत्त्यावरुन मामा आणि आई-वडिलांना घटनास्थळी बोलवले. 


'तीन वेळा कॉल केला, मात्र रिप्लाय नाही; गुरुवारी पोलिसांचाच फोन आला'


मयत ऋषिकेशच्या आईने दिलेल्या महितीनुसार, फुलेवाडीत दोन डिसेंबरला मारामारी झाल्याने लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. त्यासाठी जामीन घेण्यासाठी बुधवारी (18 जानेवारी) ऋषिकेश आणि आम्ही न्यायालयात होतो. सायंकाळी साडेसहानंतर चहा घेऊन घरातून निघून गेला. रात्री दहापर्यंत येत म्हणाला होता. तीनवेळा कॉल केला, मात्र त्याने रिप्लाय दिला नाही. त्यानंतर ऋषिकेशचा मृतदेह सापडल्याचं सांगण्यासाठी गुरुवारी (19 जानेवारी) पोलिसांचा फोन आला. 


इतर महत्वाच्या बातम्या