Kolhapur Crime : कोल्हापुरात खुनाची मालिका सुरुच आहे. आता पाचगावच्या योगेश्वरी कॉलनीजवळ गणपती मंदिरासमोर फुलेवाडीतील तरुणाचा निर्घृण खून झाला आहे. ऋषिकेश महादेव सूर्यवंशी (रा. पाचवा बस स्टॉप, फुलेवाडी) असे खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. करवीरचे पोलीस उपअधीक्षक संकेत गोसावी यांच्यासह पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
यापूर्वी, कोल्हापूर पोलिसांच्या रेकाॅर्डवरील गुन्हेगाराचा भररस्त्यात पाठलाग करुन निर्घृण खून करण्यात आला होता. गँगवॉरमधून ही घटना झाली होती. कुमार शाहूराज गायकवाड (वय 22, रा. मोरेवाडी, कोल्हापूर) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. टाकाळा खणीजवळ ही घटना घडली. हल्लेखोरांनी 17 वार करत कुमारचा खून केला. त्यापूर्वी, जामिनावर सुटलेल्या गुंडाचा पाठलाग करुन गुंडाचा निर्घृण खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील यादवनगरमध्ये 24 सप्टेंबर रोजी घडली होती. चिन्या ऊर्फ संदीप अजित हळदकर (वय 25) असे त्याचे नाव आहे.
वृद्धेचा गळा दाबून केला खून!
टोळीयुद्धातून खूनाची मालिका सुरु असतानाच उसणवारीने कर्जबाजारी झालेल्या बाप लेकाने घरात आलेल्या वृद्धेचा खून केल्याची घटना डिसेंबर महिन्यात घडली होती. लक्ष्मीबाई पाटील (वय 75 वर्षे) असे खून झालेल्या दुर्दैवी वृद्धेचे नाव आहे. लक्ष्मीबाई पाटील यांच्या अंगावरील दागिन्यांसाठी त्यांनी गळा दाबून खून केला. वृद्धेचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पोत्यात घालून निगवे खालसा दरम्यानच्या ओढ्याखाली टाकल्याची कबुली आरोपींनी दिली. बचाराम शंकर पाटील (वय 45 वर्षे) आणि त्याचे वडील शंकर पाटील (वय 70 वर्षे) या दोघांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. 23 नोव्हेंबरला ही महिला बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यामध्ये नोंद केली होती.
इतर महत्वाच्या बातम्या