Nagpur-Ratnagiri National Highway : नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणासाठी (कोल्हापूर जिल्ह्यातील) 74 किलोमीटर लांबीच्या आंबा ते चोकाक गावातील संपादित जमिनीच्या मोबदल्यात 850 कोटी रुपयांचा निधी विशेष भूसंपादन विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. रत्नागिरी ते नागपूर विभागाच्या (आंबा ते चोकाक)चौपदरीकरणासाठी जमीन संपादित झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कम वाटप करण्याकरिता गावनिहाय शिबीर आयोजित करण्यात आले आहे. सर्व गावांमधील शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई रक्कम मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रांसह संबंधित गावच्या ग्रामपंचायत कार्यालयात हजर रहावे, असे आवाहन सक्षम प्राधिकारी तथा भूसंपादन क्र. 6 चे उपजिल्हाधिकारी शक्ती कदम यांनी केले आहे.
गावनिहाय शिबीर याप्रमाणे
- 26 डिसेंबर - बोरपाडळे (पन्हाळा), आंबवडे (पन्हाळा), पिंपळे तर्फ सातवे (पन्हाळा), दाणेवाडी (पन्हाळा)
- 27 डिसेंबर - कुशिरे तर्फ ठाणे (पन्हाळा), केर्ली (करवीर), वडगांव (हातकणंगले), चोकाक (हातकणंगले)
- 28 डिसेंबर - चांदोली (शाहुवाडी), वारुळ (शाहुवाडी), निळे (शाहुवाडी), आंबा (शाहुवाडी)
- 29 डिसेंबर - चरण (शाहुवाडी), डोणोली (शाहूवाडी), आवळी (पन्हाळा), पैजारवाडी (पन्हाळा)
- 30 डिसेंबर - रोजी नागांव (हातकणंगले), माले (हातकणंगले), टोप (हातकणंगले) हेर्ले (हातकणंगले)
- 31 डिसेंबर - पडवळवाडी (करवीर), केर्ले (करवीर), निगवे दुमाला (करवीर), जाठारवाडी (करवीर)
- 2 जानेवारी - करुंगळे (शाहुवाडी), येलूर (शाहुवाडी), जाधववाडी (शाहुवाडी), पेरीड (शाहूवाडी)
- 3 जानेवारी - भैरेवाडी (शाहुवाडी), गोगवे (शाहुवाडी), ठमकेवाडी (शाहुवाडी), बांबवडे (शाहूवाडी)
- 4 जानेवारी - चनवाड (शाहुवाडी), कोपार्डे (शाहुवाडी), केर्ले (शाहुवाडी), तळवडे (शाहुवाडी)
दरम्यान, रत्नागिरी ते नागपूर या मार्गाच्या चौपदरीकरणासाठी (Nagpur-Ratnagiri National Highway) चार टप्प्यांत जमीन संपादित करण्यात आली आहे. यामधील आंबा ते पैजारवाडी व पैजारवाडी ते चोकाक असे दोन टप्पे जिल्ह्यात येतात. यातील पहिल्या टप्प्यासाठी 467 हेक्टर, तर दुसऱ्या टप्प्यासाठी 152 हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे. यापैकी जवळपास 96 टक्के जमीन संपादित झाली आहे. यातील पहिल्या टप्प्यासाठी निधीचे वाटप झाले आहे. मात्र, उर्वरित संपादित जमिनीचा मोबदला देण्यासाठी निधीच न आल्याने जमीन संपादनाचे काम रखडले होते. मिळालेल्या 850 कोटी रुपये निधीपैकी आंबा ते पैजारवाडी या मार्गासाठी 417 कोटी, तर तर पैजारवाडी ते चोकाकपर्यंतच्या मार्गासाठी 435 कोटी रुपये मिळणार आहेत. बरेच दिवस निधी मिळत नसल्याने जमीन मालक त्रस्त होते.
इतर महत्वाच्या बातम्या