कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात आहेत. पीएम नरेंद्र मोदी यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूरच्या दत्तक विधानाशी संबंधित असलेल्या धुळ्याहून राजवर्धनसिंह कदमबांडे कोल्हापुरात आले आहेत. मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार असल्याचा दावा केल्यानंतर शाहू महाराज यांनीही राजर्षी शाहू महाराज यांच्या रक्ताचा आणि विचारांचा खरा वारसदार असल्याचे प्रत्युत्तर दिलं आहे. 


दरम्यान, शाहू महाराज निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यानंतर कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांकडून आमदार सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका करत आहेत. महाराजांना विनाकारण निवडणुकीत आणून गादीचा अपमान केल्याचा आरोप होत आहे. मात्र, सतेज पाटील यांनी आरोप फेटाळून लावले आहेत. 


राजवर्धन कदमबांडे 1984 मध्ये लोकसभेच्या रिंगणात


महाराजांनी महायुतीच्या नेत्यांकडून निवडणुकीच्या रिंगणात असू नये, असा सूर असतानाच आता कोल्हापूरच्या गादीवर मीच वारसदार म्हणून दावा केलेल्या राजवर्धन कदमबांडे यांनी सुद्धा 1984 मध्ये इंडियन नॅशलन सोशलिस्ट पक्षाकडून निवडणूक लढवली होती. तत्कालिन इचलकरंजी लोकसभा मतदारसंघातून (आताचा हातकणंगले लोकसभा मतदारसंघ) बाळासाहेब माने यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, या निवडणुकीत त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. 


1984 मध्ये झालेल्या इचकरंजी लोकसभा निवडणुकीत इंडियन नॅशनल काँग्रेसकडून निवडणूक लढवताना 2 लाख 78 हजार 457 मते मिळवली होती.  राजवर्धन कदमबांडे यांना  2 लाख 34 हजार 319 मते मिळाली होती. अपक्ष उभे राहिलेल्या शिवाजी भोसले यांना 3325 मते मिळाली होती, तर चौथ्या क्रमांकावर सुद्धा अपक्ष होता. 


दरम्यान, कदमबांडे यांनी 1984 मध्ये झालेल्या पराभवानंतर आपण आताच सक्रिय झाला आहात ? असे विचारले असता कदमबांडे यांनी दैनिक पुढारीशी बोलताना सांगितले की, भाजपकडून देण्यात आलेली जबाबदारी पार पाडत आहे. 1984 मध्ये पराभव जाल्यानंतर कोल्हापूरमध्ये वास्तव्यास होतो. विजयमाला महारामीसाहेब यांच्या निधनानंतर धुळ्याला गेल्यानंतर त्याठिकाणी सक्रिय झाल्याचे सांगितले. 


मी कोणताही जुना वाद बाहेर काढण्यासाठी आलो नाही


दरम्यान, त्यांनी रविवारी माध्यमांशी बोलताना सांगितले की, धुळ्यात जास्त कार्यरत राहिल्याने कोल्हापूरकडे थोडं दुर्लक्ष झालं. भाजप राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांच्या विरोधात नाही. मी कोणताही जुना वाद बाहेर काढण्यासाठी आलो नसून तो आमचा घरगुती वाद आहे. मी आता केवळ महायुतीच्या उमेदवारांना मतदान करण्याचं आवाहन करण्यासाठी आलो असल्याचे म्हणाले.


गादीचे वारसदार खरे की खोटे ही जनता ठरवेल 


ते म्हणाले की, मी राजर्षी शाहू महाराज यांचा रक्ताचा वारसदार आहे. राजर्षी शाहू महाराज यांचा पणतू आणि प्रिन्स पद्माराजे यांचा चिरंजीव आहे. गादीचे वारसदार खरे की खोटे ही जनता ठरवेल असे त्यांनी सांगितले. मी राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांचा वारसदार आहे, आताचे शाहू महाराज हे संपत्तीचे वारसदार आहेत. आताचे शाहू महाराज हे शहाजी महाराज यांचे वारसदार असू शकतात, राजर्षी शाहू महाराज यांचे वारसदार नाहीत, असेही त्यांनी सांगितले. 


वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद 


कदमबांडे म्हणाले की, वारसदार कोण हा आमचा घरगुती वाद आहे त्याबद्दल जास्त बोलणार नाही. दत्तक घेताना काय वाद झाला होता याबद्दल आपण सगळे जाणून आहात. दरम्यान, शरद पवार यांच्याबद्दल बोलणार नाही, असे त्यांनी सांगितले. मी सध्या धुळे शहरात काम करतो, त्याच ठिकाणी राजकीय आणि सामाजिक काम करतो. कोल्हापूरच्या जनतेची इच्छा असेल आणि भाजपने सांगितले तर कोल्हापुरात सक्रिय होईन. 


इतर महत्वाच्या बातम्या