कोल्हापूर : मागील वर्षी ऊस प्रश्नावर महामार्गावर महामार्ग रोको आंदोलन केलं होतं. मागील वर्षे तुटलेल्या ऊसामधून मिळालेल्या फायद्यातून शेतकऱ्यांना किमान शंभर रुपये प्रति टन मिळावेत ही मागणी होती. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांनी दिली होती. आश्वासन पाळणे हे सरकार जबाबदारी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तसं न करता काळे झेंडे दाखवून आमच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली, तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते मागे म्हटले नाहीत पण सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप देखील माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला. 


शक्तीपीठ महामार्गावरून मंत्र्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप शेट्टी यांनी केला. त्यामुळे 26 जून रोजी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी आम्ही कागलवरून कैफियत यात्रा काढणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी केली. कागल ते शाहू समाधीस्थळ अशी यात्रा काढण्यात येणार आहे.


भूसंपादन थांबवण्यासाठी कोणताच आदेश नाही


ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर जयंती सरकार साजरी करत आहे, पण ज्या राजाने प्रजेच्या हितासाठी नेहमीच विचार केला त्या राजाच्या शतकोत्तर जयंतीवर्षी सरकार दिलेला शब्द पाळत नाही. सरकारकडून शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादन करणार नाही असे सांगण्यात येत आहे. मात्र, याबाबत अधिकाऱ्यांना विचारणा केली असता कोणताही आदेश आले नसल्याचे त्यांनी सांगितले.


मागील हंगामातील प्रतिटन शंभर रुपये घेतल्याशिवाय त्यांच्या बापाला देखील सोडणार नाही, हे साखर कारखानदारांनी लक्षात घ्यावे. मी कोणतीही अपेक्षा ठेवता चळवळ करत आलो आहे. यावेळी कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल, पण आम्ही लढत राहणार आहोत. मी हार मानणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले. 


हमीभावाची तुलना करा


राजू शेट्टी यांनी सांगितले की, काँग्रेस सरकार असताना साखरेचा किती हमीभाव वाढला आणि भाजप सरकारच्या काळामध्ये किती हमीभाव पडला याची तुलना करा. काँग्रेसच्या कार्यकाळात रासायनिक खतांची किंमत काय होती आणि आता काय आहे त्याची सुद्धा तुलना करा. उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी रासायनिक खतांवर अनुदान होतं. मात्र, सगळी अनुदान कमी केली गेली आहेत. साखरेचा हमीभाव वाढत नाही असे कारखानदार म्हणतात. त्यामुळे मी त्यांना सांगतो की आमच्या सोबत रस्त्यावर या, कसा वाढवून देत नाही ते बघतो. ईडी आणि सीडीला कशाला घाबरता? अशी विचारणा शेट्टी यांनी केली. 


इतर महत्वाच्या बातम्या