कोल्हापूर:  स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या (swabhimani shetkari sanghatana) वतीने आज  कोल्हापूर (Kolhapur News)  आणि सांगली जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर आत्मक्लेष पदयात्रा काढण्यात आली. त्याची सुरुवात शिरोळ तालुक्यामधील दत्त कारखान्यापासून झाली. एकूण 22 दिवस आणि 522 किलोमीटर ही पदयात्रा असणार आहे. राजू शेट्टी  (Raju Shetti) या पदयात्रेमध्ये सहभागी झालेत. तसंच स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषदही पार पडणार आहे 


स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून 22 दिवस आत्मक्लेश आंदोलन करण्यात येणार आहे. स्वतः राजू शेट्टी या पदयात्रेमध्ये सहभागी होणार असून 22 दिवसात कोणत्याही वाहनांमध्ये ते बसणार नाहीत.7 नोव्हेंबर रोजी जयसिंगपूर स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 22 वी ऊस परिषद पार पडणार आहे . गेल्यावर्षीचे 400 रुपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू होऊ देणार नाही, असा गर्भित इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे. यावर्षी साखरेच्या दराचे आंदोलन गांधीगिरीच्या मार्गाने करणार आहे. पश्चिम महाराष्ट्रातील सर्व साखर कारखान्यांवर पायी जाणार आहे


बच्चू कडूंनी सांगलीमध्ये राजू शेट्टींची भेट घेतली, दोघांमध्ये दीड तास चर्चा 


राजू शेट्टी यांच्या आत्मक्लेष पदयात्रेला बच्चू कडूंनी देखील पाठिंबा दिला आहे.  बच्चू कडूंनी सांगलीमध्ये राजू शेट्टींची भेट घेतली, दोघांमध्ये दीड तास चर्चा झाल्याची माहिती. यावेळी बचू कडू यांनी  आजपासून राजू शेट्टी यांच्या  सुरू होणा-या आक्रोश मोर्चाच्या 522 किलोमीटर पदयात्रेस पाठिंबा व्यक्त करून शेतक-यांच्या प्रश्नावर आवाज तीव्र करण्यासाठी असूड देऊन सत्कार केला.   यावेळी त्यांनी राज्यातील शेतक-यांचे प्रश्न , विविध शेतकरी आंदोलने व त्याबाबत पुढील भूमिकेबाबत तसेच महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीबाबत जवळपास दीड तासाहून अधिक काळ चर्चा केली. मध्यंतरी राजू शेट्टी यांनी बच्चू कडू यांना परत तुम्ही शेतकऱ्यांसाठी बाहेर पडा असं आवाहन केलं होतं या दोघा नेत्यांच्या भेटीमुळे मात्र चर्चेला उधाणे आले आहे.


7 नोव्हेंबरला ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता


ऊस निर्यातबंदी केल्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं राज्य सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पाडले होते. आता गेल्यावर्षीच्या तुटलेल्या ऊसाच्या हिशेबावरून स्वाभिमानीने साखर कारखान्यांना धारेवर धरले आहे.  कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील काराखान्यांवर ही पदयात्रा निघणार आहे. 7 नोव्हेंबरला जयसिंगपूर येथे होणाऱ्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेत पदयात्रेची सांगता होणार आहे. याच परिषदेते हंगामात कोणती भूमिका घ्यायची याचा निर्णय घेण्यात येणार आहे. 


हे ही वाचा :


Sugar Scam : राज्यात पाच हजार कोटींचा साखर घोटाळा, राजू शेट्टींकडून कारखान्याचे स्टींग ऑपरेशन