कोल्हापूर : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी राहिला असतानाच राहुल गांधी महिनाभरात दुसऱ्यांदा पश्चिम महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याकडे अवघ्या राज्याचे लक्ष आहे. राहुल गांधी यांच्या हस्ते उद्या बावड्यातील छत्रपती शिवरायांच्या पुर्णाकृती पुतळ्याचे अनावरण तसेच दुसऱ्या संविधान संमेलन त्यांच्या उपस्थितीत होणार आहे. यापूर्वी राहुल गांधी यांनी मार्च 2009 मध्ये कोल्हापूर दौरा केला होता. 


असा असेल कोल्हापूर दौरा


राहुल गांधी उद्या शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर विमानतळावर येत आहेत. विमानतळावरु कसबा बावड्यामधील भगवा चौकात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा लोकार्पण कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात ते काय बोलणार याकडे सुद्धा राजकीय वर्तुळाचे लक्ष असेल. दुसऱ्या दिवशी दुपारी दीड वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. यानंतर हॉटेल सयाजीमध्ये होणाऱ्या संविधान संवाद सन्मान संमेलनाला उपस्थित राहतील.


दरम्यान, हॉटेल सयाजीमध्ये होत असलेल्या संविधान संमेलनासाठी विविधसामाजिक संघटनेची निमंत्रित बाराशे प्रतिनिधींच्या उपस्थितीत होणार आहे. 14 वर्षांनी राहुल गांधी कोल्हापुरात येत असल्याने आमदार सतेज पाटील यांच्यासह जिल्हा काँग्रेसव  नियोजन करत आहे.



  • राहुल गांधी यांचे 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल

  • सायंकाळी सहा वाजता कसबा बावडा येथील छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा लोकार्पण होईल

  • 5 ऑक्टोबर रोजी दुपारी दीड वाजता छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळी अभिवादन होणार आहेत

  • दुपारी अडीच वाजता हॉटेल सयाजीमध्ये संविधान संमेलन कार्यक्रमास उपस्थिती राहतील. 

  • सायंकाळी चार वाजता हॉटेल सयाजी येथून कोल्हापूर विमानतळाकडे ते प्रयाण करतील,


असा असेल प्रवासाचा मार्ग


कोल्हापूर विमानतळ-शाहू नाका-शिवाजी विद्यापीठ-कावळा नाका-धैर्य प्रसाद चौक, एसपी ऑफिस चौक भगवा चौक कसबा बावडा असा असणार आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या