कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचा अपमान करून इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या प्रशांत कोरटकरवर कारवाई करण्यासाठी इंडिया आघाडी आणि शिवप्रेमींनी कोल्हापुरात आक्रमक पवित्रा घेतला आहे. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असल्याने त्यांच्यासमोर आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. पोलिसांशी झालेल्या बैठकीनंतर आंदोलनाचा निर्धार कायम ठेवल्याने आज (6 मार्च) कोल्हापूर आंदोलकांची धरपकड सुरु केली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या आंदोलकांना पोलीस ताब्यात घेण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर पोलिसांनी रात्रीच प्रमुख कार्यकर्त्यांना नोटीस पाठवल्या आहेत.
दुसरीकडे, प्रशांत कोरटकरला 11 तारखेपर्यंत अंतरिम जामीन मिळाला असल्याने आंदोलन स्थगित करा अशी कोल्हापूर पोलिसांची विनंती आहे. जुना राजवाडा पोलीस ठाण्यामध्ये आंदोलकांसोबत पोलिसांनी बैठक केली. मात्र, प्रशांत कोरटकरबरोबर युट्यूब कमेंटमधून धमकी देणाऱ्या केशव वैद्यवर देखील कारवाई करा अशी आंदोलकांची मागणी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर पुढीलप्रमाणे
- गुरुवार, दिनांक ०६ मार्च, २०२५ रोजी सायंकाळी ०५.०० वा. कोल्हापूर विमानतळ येथे आगमन.
- सायंकाळी ०५.०५ वा. मोटारीने विन्स हॉस्पिटल, बावडा रोड, महावीर कॉलेज जवळ, नागाळा पार्क, कोल्हापूरकडे प्रयाण.
- सायंकाळी ०५.२५ वा. विन्स हॉस्पिटल, बावडा रोड, महावीर कॉलेज, कोल्हापूर येथे आगमन.
- सायंकाळी ०५.३० वा. WIINS (विन्स) मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, कोल्हापूरचे उद्घाटन.
- सायंकाळी ०५.४५ वा.मोटारीने श्री क्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
- सायंकाळी ०६.३० वा. श्री क्षेत्र पैजारवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर येथे आगमन.
- सायंकाळी ०६.३० वा. शिक्षण महर्षी पांडुरंग हिरवे गुरूजी व शिक्षणव्रती भार्गव देशपांडे गुरूजी यांचा अर्धाकृती पुतळा अनावरण समारंभ.
- सायंकाळी ०६.४५ वा. मोटारीने पन्हाळगड, जि. कोल्हापूरकडे प्रयाण.
- सायंकाळी ०६.५५ वा. पन्हाळगड, जि. कोल्हापूर येथे आगमन.
- सायंकाळी ०७.०० वा.पन्हाळगडचा रणसंग्राम हा लघुपट व १३ डी थिएटरचा लोकार्पण सोहळा
- रात्री ०९.०० वा.मोटारीने कोल्हापूर विमानतळकडे प्रयाण.
- रात्री ०९.५० वा. कोल्हापूर विमानतळ, कोल्हापूर येथे आगमन.
- रात्री ०९.५५ वा. विमानाने प्रयाण.
इतर महत्वाच्या बातम्या