कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील दऱ्याचे वडगावमधील जिल्हा परिषदेच्या शाळेत सिंघम चित्रपटातील डायलाॅगवर रिल्स केल्याची धक्कादायक घटना घडली. शाळेमधील व्हायरल झालेला व्हिडिओ हा पंधरा दिवसांपूर्वीच असून हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या आहेत. दरम्यान, व्हिडिओ व्हायरल होताच मुख्याध्यापकांनी आपणच फोटो काढण्यासाठी परवानगी दिली होती असा धक्कादायक कबुली दिल्याने संतापात आणखी भर पडली आहे.


शाळेतील इतर साहित्य सुद्धा वापर करण्यात आला


ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरक्षेचा प्रश्न आहे ऐरणीवर आला असताना शाळेमध्ये व्हिडिओ करण्यासाठी थेट मुख्याध्यापकानेच परवानगी दिल्याने संतापात भर पडली. दरम्यान हा व्हिडिओ व्हायरल होताच ग्रामस्थांच्या संतापाच्या प्रतिक्रिया उमटल्या. रिल्समध्ये शाळेतील खुर्चीवर लाथ मारल्याने जिथं शिकलो, तिथं लाथ मारल्यासारखा प्रकार झाला आहे. खुर्चीवर लाथ मारण्यासाठी तसेच शाळेतील इतर साहित्य सुद्धा वापर करण्यात आला होता.


शाळेच्या सुरक्षेची चिंता नाही का?


दुसरीकडे जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळांच्या सुरक्षांसाठी सीसीटीव्ही बसवले जात असताना अशा पद्धतीने शाळेचा वापर रिल्स करण्यासाठी झाल्याने शाळा समिती काय करत होती असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे. मुख्याध्यापकांनी आपणच फोटो काढण्यासाठी परवानगी दिली होती अशी धक्कादायक कबूल दिल्याने शाळेच्या सुरक्षेची चिंता नाही का असा सुद्धा प्रश्न उपस्थित झाला आहे


इतर महत्वाच्या बातम्या