बेळगाव : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आरोपी जयेश पुजारीने न्यायालय आवारात पाकिस्तान झिंदाबादची घोषणा दिल्याने एकच खळबळ उडाली. यावेळी संतप्त झालेल्या जमावाकडून जयेश पुजारीची धुलाई करण्यात आली. 


न्यायालय परिसरातच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा


नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिलेल्या जयेश पुजारीने पोलिस अधिकाऱ्याला सुद्धा धमकी दिल्याच्या प्रकरणात आज (12 जून) जयेश पुजारीला बेळगाव न्यायालयात करण्यात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्याने न्यायालय परिसरातच पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. जयेश पुजारीने मंत्री नितीन गडकरी यांना सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याची धमकी दिली होती. 


लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न


दरम्यान, काही दिवसांपूर्वीच तुरुंगात असताना लोखंडी तार गिळण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर जयेश पुजारीला देखरेखीखाली ठेवण्यात आले होते. तुरुंग अधिकाऱ्यांना दिलेल्या माहितीनुसार वायरचा तुकडा गिळला होता. न्यायालयात हजर करण्यात आले त्याने दाव्याचा पुनरुच्चार केला होता. न्यायालयाच्या आदेशानुसार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याची तपासणी केली होती. 


तपासणीत त्याच्या पोटात वायरचे तुकडे असल्याची पुष्टी झाली, परंतु त्याच्या प्रकृतीवर कोणताही परिणाम झाला नाही आणि त्याला डॉक्टरांनी तंदुरुस्त घोषित केले, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्यानंतर त्याला पुन्हा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले. 


100 कोटी रुपयांची मागणी


पुजारीने स्वत:ला बेळगाव तुरुंगात हलवण्याचा वारंवार प्रयत्न केला होता, जिथे त्याला आधी ठेवण्यात आले होते, असे अधिकाऱ्याने सांगितले. त्याने तेथे गुन्हेगारी नेटवर्क तयार केले होते आणि मोबाइल फोन आणि इतर काही सुविधा उपलब्ध करून दिल्याने त्याला त्या कारागृहात जायचे होते असा संशय आहे.


बेळगावी तुरुंगात असताना, पुजारीने बेंगळुरू दहशतवादी हल्ल्याचा दोषी अफसर पाशा याच्याशी संगनमत करून या वर्षी जानेवारीमध्ये गडकरींच्या कार्यालयात धमकीचे फोन केले होते. दाऊद इब्राहिम टोळीचा सदस्य असल्याचा दावा करत त्याने 100 कोटी रुपयांची मागणी केली होती. 21 मार्च रोजी त्याने दुसरा फोन केला होता. त्यानंतर त्याला या प्रकरणात अटक करून नागपुरात आणण्यात आले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या