Anil Parab : राज्यात महाविकास आघाडी सरकार असताना मोठी गुंतवणूक राज्यात येत होती. मात्र, या गद्दारांनी सरकार पाडले. तीन महिन्यात राज्यात पुन्हा आपले सरकार येईल, असा विश्वास शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी व्यक्त केला. पदवीधर मतदारसंघातून अनिल परब निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अनिल परब यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली. परब म्हणाले की, यापूर्वी मी विधान परिषदेवर आमदारांमधून निवडून जात होतो. आता मी पदवीधर मतदारसंघातून निवडून जाणार आहे. मी पदवीधरांसाठी काय करणार आहे, माझे विचार काय आहे ते वचननाम्यामध्ये असल्याचे परब यांनी सांगितले. पदवीधर निवडणूक आतापर्यंत पाचवेळा शिवसेनेने जिंकली असल्याचे ते म्हणाले. 


तीन महिन्यात आपलं सरकार येईल


ते म्हणाले की,आपल्या राज्यात मोठी गुंतवणूक येत असताना गद्दारांनी सरकार पाडले. आता तीन महिन्यात आपलं सरकार येईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की पदवीधरांना नोकरी मिळत नाहीत. परदेशात जाणाऱ्या पदवीधर तरुणांना, तसेच विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन सुद्धा मिळत नाही. त्यामुळे पदवीधर बेरोजगार तरुणांना कोणत्याही योजना माहीत नाहीत. त्यामुळे तरुणांसाठी वेगळे व्यासपीठ तयार करणं माझं कर्तव्य माझं काम असल्याचं ते म्हणाले. 


मला माझ्या पक्षाचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी आज राज्यपालांची भेट घेतली. या भेटीवरपरब यांनी भाष्य केले. ते म्हणाले की परीक्षांचा घोळ होत असल्याने यासाठी वेगळा कक्षा असायला हवा. त्यासाठी वेगळी यंत्रणा असला पाहिजे. ज्यांची पात्रता आहे तो बाहेर असतो आणि पात्रता नसतो तो मेरिटमध्ये असतो अशी टीकाही त्यांनी केली. नवीन आर्थिक मागासवर्गीय मुलं आहेत त्यांच्यासाठी कोणतीही संस्था नसल्याचे त्यांनी सांगितले. 


अनिल परब यांच्या आरोपांची आयोगाकडून तपासणी


दरम्यान, कोणत्याही कारणाशिवाय निवडणूक आयोगाने मुंबई पदवीधर मतदारसंघाच्या पुरवणी यादीत 12 हजार नावे समाविष्ट केली नसल्याचा आरोप अनिल परब यांनी केला होता. या आरोपाची आयोगाने दखल घेतली आहे. परब यांनी दिलेली नावे मतदार यादीत का समाविष्ट झालेली नाहीत याचा शोध सुरू करण्यात आला आहे. आक्षेपानंतर मतदान केंद्र बदलण्याच्या हालचालीही आयोगाने सुरू केल्या आहेत. परब यांनी अर्ज नाकारण्याची कारणे समजणे हा अधिकार आहे. यंदा अर्ज स्वीकारूनही नावे आली नाहीत आणि त्याची कोणतीही कारणे आम्हाला दिलेली नाहीत. यात खूप मोठी गडबड असल्याचा अनेक गंभीर आरोप परब यांनी केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या