Kolhapur Rain : पावसाने सलग उघडीप दिल्याने पंचगंगा नदीचा पूर झपाट्याने ओसरल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. पंचगंगेची पातळी काल दिवसभरात साडे तीन फुटांनी पंचगंगा नदीची पातळी कमी झाली. आज सकाळी राजाराम बंधाऱ्याजवळ पाणी पातळी  35 फुट 7 इंच इतकी होती. जिल्ह्यातील बंधाऱ्यांवरील पाण्याचा वेढाही झपाट्याने कमी झाला असून आता केवळ 32 बंधाऱ्यांवर पाणी आहे. आज दिवसभरात या बंधाऱ्यांवरील पाणी कमी होण्याची शक्यता आहे. 


राधानगरी धरणाचा एक दरवाजा सुरु 


राधानगरी धरणाचा 6 व्या क्रमांकाचा स्वयंचलित धरवाजा सुरु आहे. सुरु असलेला दरवाजा आणि पाॅवर हाऊस मिळून धरणातून 3 हजार 28 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.  


तुळशी धरणातून विसर्ग बंद केला 


कालपासून तुळशी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कमी झाल्यामुळे सुरु असलेला 400 क्यूसेक पाण्याचा विसर्ग बंद करण्यात येत आहे. याबाबत तुळशी धरण प्रशासनाकडून माहिती देण्यात आली आहे. 


अलमट्टी धरणातून दीड लाख क्युसेक विसर्ग सुरु 


कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानंतर अलमट्टी धरणातून दोन्ही राज्यातील प्रशासनाच्या समन्वयातून विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे पूर परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत झाली होती. सध्या धरणातून दीड लाख क्युसेकने विसर्ग सुरु आहे. हिप्परगी धरणातून 1 लाख 81 हजार क्युसकने विसर्ग होत असल्याने अलमट्टीत सध्या 2 लाख 14 हजार 419 क्सुसेकने आवक होत आहे.


कोयना धरणातूनही 21 हजार 281 क्युसेक विसर्ग सुरु


कोयना धरणामध्ये पाणी पातळी सध्या 657.30 मीटर असून 96.22 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसाने सध्या 36 हजार 26 क्युसेकने आवक होत आहे. धरणातून 21 हजार 281 क्युसेक पाण्याचा विसर्ग होत आहे. 


जिल्ह्यातील पाण्यात असलेले बंधारे



  • पंचगंगा नदी -   शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ

  • भोगावती नदी -  हळदी, सरकारी कोगे, राशिवडे,  शिरगाव, तारळे, खडक कोगे

  • कासारी नदी - यवलूज, पुनाळ,  तिरपण,  ठाणे आळवे 

  •  वेधगंगा नदी -  बस्तवडे, चिखली

  • वारणा नदी - चिंचोली, माणगाव, कोडोली, तांदूळवाडी, शिगांव, खोची, मांगले सावर्डे, चावरे, दानोळी  

  • दुधगंगा नदी - दत्तवाड, सुळकुड, सिद्धनेर्ली, बाचणी

  • तुळशी नदी -  बीड


इतर महत्वाच्या बातम्या