Kolhapur Crime : करवीर तालुक्यातील वडणगे गावामध्ये विवाहितेने पोटच्या सहा महिन्याच्या चिमुकलीसह विहिरीमध्ये उडी घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मात्र, विहिरीजवळ असलेल्या ग्रामस्थांनी आरडाओरडा केल्याने तिला वाचवण्यात यश आले. पण सहा महिन्याच्या चिमुकल्या मुलीचा मृत्यू झाला. तनुजा चव्हाण असे त्या चिमुकलीचे नाव असून तिची आई मोनिका चव्हाणला वाचवण्यात यश आले.
या विवाहित महिलेने कोणत्या कारणावरून हे कृत्य केले याचे कारण समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार वडणगेमधील 6 महिन्यांच्या बालिकेसह विवाहितेने घराजवळील विहिरीत उडी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. येथील चौगले मळ्यात लमान समाजातील परशुराम चव्हाण हे आपल्या कुटुंबासोबत वडणगे येथे राहतात.
पहाटे साडेपाचच्या सुमारास परशुराम चव्हाण यांची पत्नी मोनिका आपल्या सहा महिन्यांच्या तनुजा या मुलीला सोबत घेत बाहेर पडली. घराजवळच असलेल्या विहिरीत तिने मुलीसह उडी घेतली. मात्र, विहिरीजवळ असलेल्या ग्रामस्थांना उडी घेताना दिसल्याने आरडाओरडा केला. त्यांनी मोनिका आणि बाळाला तातडीने बाहेर काढण्यासाठी तातडीने प्रयत्न सुरु केले.
बाळाला वाचवण्यात यश आले नाही, पण मोनिकाला बाहेर काढण्यात यश आले. तिला पोहता येत असल्याने ती विहिरीच्या काठावर आली. तिला ग्रामस्थांनी बाहेर काढले. घटनेत बालिकेचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेची नोंद करवीर पोलिसांकडे झाली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या