Malojiraje Chhatrapati : ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनचे (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्य मालोजीराजे छत्रपती यांची फेडरेशनच्या फायनान्स कमिटी उपाध्यक्षपदी तसेच कॉम्पिटेशन कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. ते कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. मालोजीराजे यांच्या सुविद्य पत्नी मधुरिमाराजे छत्रपती यांची सलग दुसऱ्यांदा ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन महिला कमिटी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. एकाचवेळी दोघांची निवड झाल्याने कोल्हापूर फुटबॉल खेळाडूमध्ये आनंदाचे अणि उत्साहाचे वातावरण आहे. 


दरम्यान, किरण चौगुले यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या लीग कमिटीच्या सदस्यपदी, तर धनराज मोरे यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या रेफ्री कमिटीच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. 


मालोजीराजे छत्रपती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्षही आहेत. मालोजीराजे छत्रपती गेली दहा वर्षांपासून वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीबद्दल कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. त्यामुळे या निवडीने खेळाडूंमध्ये विशेष आनंदाचे वातावरण आहे. 


दुसरीकडे फेडरेशनच्या नवीन कार्यकारिणीमध्ये जीपी पल्गुना, अविजित पॉल, पी अनिलकुमार, वलंका नताशा आलेमाओ, मालोजीराजे छत्रपती, मेनला इथेंपा, मोहन लाल, आरिफ अली, के नेबू सेखोसे, लालनघिंगलोवा हमर, दीपक शर्मा, विजय बाली आणि सय्यद इम्तियाज हुसैन यांचा समावेश आहे.


दरम्यान, फीफाने फेडरशनवरील बंदी उठवल्याने 11 ते 30 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात येणाऱ्या 17 वर्षांखालील महिला विश्वकप स्पर्धेचं आयोजन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. फीफाने भारतीय फुटबॉल महासंघाच्या निवडणुकीसाठी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे. 


इतर महत्त्वाच्या बातम्या