कोल्हापूर : कोल्हापूर शहरासह कोल्हापूर जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी शनिवारी (8 जून) सर्वदूर दमदार पावसाने हजेरी लावली. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर झालेल्या पावसाने शेतकरी वर्ग सुखावला असला, तरी काही ठिकाणी रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर केलेल्या पेरण्या जोरदार पावसाने वाहून गेल्या आहेत. 

Continues below advertisement

शनिवारी संध्याकाळी झालेल्या तुफानी पावसामुळे काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पावसाची नोंद झाली. दरम्यान, हवामान विभागाकडून पुढील तीन दिवसांसाठी कोल्हापूर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. कागल तालुक्यातील हणबरवाडीमध्ये जोरदार पावसाने एक रेडकू आणि दोन शेळ्या ओढ्याच्या पाण्यातून वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली. 

आजरा तालुक्यातील बहिरीवाडीत शनिवारी सायंकाळी ढगफुटीसदृश्य पावसाची नोंद झाली. सुमारे तीन तास पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकऱ्यांच्या पेरणी केलेल्या भात, सोयाबीन, भुईमूग पिकांच्या पेरण्या पूर्णत: वाहून गेल्या. त्यामुळे मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, जमिनीमध्ये आल्याने ओलाव्याने शेतकऱ्यांमध्ये आनंद असला, अनेक ठिकाणी पेरलेलं बियाणे मात्र वाहून गेलं आहे. ज्या ठिकाणी पेरणी वाहून गेली आहे, त्या ठिकाणी दुबार पेरणी करावी लागणार आहे. 

Continues below advertisement

दुसरीकडे आजरा तालुक्यातील बहिरेवाडीत मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी घरामध्ये पाणी शिरले. ओढ्याला आलेल्या पुरात एक रेडकू आणि दोन शेळ्या वाहून गेल्या. बेरडवाडीमध्ये काही लोकांच्या घरात पाणी शिरल्याने प्रापंचिक साहित्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नाल्यांना पूरसदृश्य रिस्थिती निर्माण झाली. इचलकरंजी शहरामध्ये सुद्धा जोरदार पावसाने हजेरी लावली. काल सायंकाळी झालेल्या पावसाने अनेक ठिकाणी नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे वाहतूक सुद्धा विस्कळीत झाली होती. दुसरीकडे, राधानगरी तालुक्यातही सुद्धा जोरदार पावसाची नोंद झाली. 

इतर महत्वाच्या बातम्या