Kolhapur Water News: वळीव पावसाने मारलेडी दडी त्यानंतर रोहिणी नक्षत्रातही पुरेसा पाऊस न झाल्याने कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये (Kolhapur Water News) पाणीबाणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कोल्हापूरची जीवनवाहिनी असलेल्या राधानगरी धरणामध्ये फक्त 20 दिवस पाणी पुरवठा पाणीपुरवठा होईल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे दिवसाआड पाणीपुरवठा आणि उपसाबंदीचा पर्याय आहे. 


रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं 


कोल्हापूर जिल्ह्यातील बळीराजाचे लक्ष आभाळाकडे लागलं आहे. रोहिणी नक्षत्राचा मुहूर्त साधून शेतकर्‍यांनी पेरणी करून घेतली. मात्र, पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे परिस्थिती एकंदरीत बिकट होत चालली आहे. रोहिणी नक्षत्र पूर्णपणे कोरडं गेल्यानंतर मृग नक्षत्राचा तिसरा दिवस उजाडला तरी पावसाने हजेरी लावलेला नाही. त्यामुळे पेरणी केलेली संकटात आली आहे. त्यामुळे पाण्यावाचून हाल होण्याची शक्यता आहे.


पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत


राधानगरी धरणात (Radhanagari Dam) 400 क्युसेकने विसर्ग होत असला, तरी नदीकाठावर मोठ्या प्रमाणात उपसा होत असल्याने कोल्हापूरमधील पिण्याचे पाण्याचे नियोजन कोलमडले आहे. दुसरीकडे गेल्या काही दिवसांपासून लांबलेला पाऊस लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून पाणी नियोजनासाठी चांगलीच कसरत सुरु आहे. उपसाबंदीचाही अवलंब करण्यात आला. मात्र, त्याला शेतकऱ्यांकडून विरोध झाला. त्यामुळे काही वेळा उपसाबंदी काही वेळा पुन्हा निर्णय मागे अशी स्थिती दिसून आली. एकंदरीत नद्यांनी आणि धरणांनी सुद्धा तळ गाठल्याने आता शेतीऐवजी पिण्याच्या पाण्याला प्राधान्य प्राधान्य दिले जाईल अशी शक्यता आहे.  


राधानगरी धरणाने सात वर्षांनी तळ गाठला 


राधानगरी धरणातील पाणी कमी होण्याची सात वर्षांनी  उद्भवली आहे. 2015 मध्ये राधानगरी धरणाने तळ गाठला होता. त्यावेळी फक्त अर्धा टीएमसी पाणीसाठा उपलब्ध होता, त्यानंतर प्रथमच पाणी पाण्याची पातळी खाली गेली आहे. भोगावती नदीने तळ गाठल्याने बालिंगा आणि शिंगणापूरमधून उपसा कमी होऊ लागला आहे. त्यामुळे कोल्हापूर शहराच्या पाणीपुरवठ्याव परिणाम झाला आहे. आज घडीला राधानगरी धरणातून 421 तुळशी धरणातून 300 आणि कुंभी धरणातून 250 क्युसेक पाणी सोडले जात आहे. मात्र, शेतीसाठी मोठा उपसा होत आहे. दरम्यान, कोल्हापूर शहराची पाणी गरज लक्षात घेऊन काळम्मावाडी धरणातील पाणी बोगद्यातून घेण्याचे नियोजन सुरु आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या