Eknath Shinde In Kolhapur: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दुसऱ्यांदा कोल्हापूर दौरा पुढे ढकलला आहे. आता पुन्हा दौरा 13 जून रोजी त्यांचा शासन आपल्या दारी कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मंगळवारी  तपोवन मैदानात जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती पालकमंत्री दीपक केसरकर यांनी दिली. 


शासन आपल्या दारी कार्यक्रम कोल्हापुरात येत्या 13 तारखेला होणार असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री तसेच काही मंत्री असणार उपस्थित राहणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले. केसरकर यांनी सांगितले की, शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचावा आणि त्याचा लाभ मिळावा यासाठी या कार्यक्रमाचा आयोजन महाराष्ट्रभरात केला जात आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी दिलेल्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांना भेटण्यासाठी खास स्वतंत्र वेळ देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. 


राजू शेट्टी यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतील


केसरकर यांनी सांगितले की, राजू शेट्टी यांच्याशी मुख्यमंत्री चर्चा करतील. जाब विचारण्या अगोदर आपले प्रश्न मांडायचे असतात. मुख्यमंत्र्यांना राज्यातील अनेक प्रश्न हाताळायचे असतात. मात्र, ते शेतकऱ्यांना प्राधान्य देतात.  शिंदे सरकारच्या काळात शेतकऱ्यांना जेवढा निधी मिळाला तेवढा आजपर्यंत कोणाच्या सरकारमध्ये मिळाला नाही. उर्वरित काही मागण्या असतील तर त्याचाही विचार होईल. 


कोल्हापूर दंगलीवर काय म्हणाले? 


केसरकर यांनी सांगितले की, कोल्हापूर आता पूर्णपणे शांत झालं आहे. हे छत्रपती शाहू महाराजांनी शिवाजी महाराजांच्या विचारांचे शहर आहे. असे प्रकार घडू नये यासाठी वेळेवर कारवाई व्हावी यासाठी पोलिसांना सूचना देण्यात आल्या आहेत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापुरात येत असल्याने आणखी दिलासा मिळेल. विकास निधीवरूनही त्यांनी भाष्य केले.  विरोधी आमदारांना निधी दिला जात नाही असे नसल्याचे केसरकर म्हणाले. गेल्यावर्षी देखील त्यांना निधी देण्यात आला आहे. त्यांच्याशी मी चर्चा करेन. आमदार हसन मुश्रीफ आणि सर्व आमदार जेव्हा उपस्थित असतील तेव्हा देखील पुन्हा चर्चा केली जाईल. 


शाहू महाराजांच्या भूमिकेवर म्हणाले..


बैठक शाहू महाराजांच्याच विचाराने झाली. जेव्हा मी मंत्री झालो तेव्हा मी शाहू महाराजांचे आशीर्वाद घेतले. दंगली सारख्या प्रसंगात ज्यांना आपण पूजनीय आणि जेष्ठ मानतो त्यांना रस्त्यावर आणलं जात नाही. बैठकीत देखील वातावरण गरम होतं. मात्र, नंतर शांत झालं. तरीही मी त्यांना एक शांततेचा आवाहन करण्याचा विनंती केली आणि त्यांनी ते त्याप्रमाणे केलं. काही गोष्टी अनावधानाने राहून जातं मुद्दामहून डावलण्याचं आमचं प्रयत्न नसतो. दंगलीमध्ये यांचे नुकसान झाले आहे त्यांचे जिल्हाधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन पूर्ण फूल न् फुलाची पाकळी मदत होईल. भावनेच्या भरात जे काय ते घडून जात असतं. आंदोलन झालं की खटला दाखल करतो, मात्र तेही नतर मागे घेतात. यामुळे या प्रसंगात देखील सर्वांचे जामीन मंजूर झाला आहे तसेच खटले कशा पद्धतीचे आहेत बघून योग्य वेळी योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या