Dhananjay Mahadik on Satej Patil : कोल्हापुरात झालेल्या जातीय दंगलीनंतर आता आरोप प्रत्यारोपांची दंगल सुरु झाली आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांनी सोलापुरात बोलताना अप्रत्यक्षरित्या कोल्हापुरातील घटनेवरुन माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्याकडे बोट केले आहे. धनंजय मडाडिक म्हणाले की, "कोल्हापुरातील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. परंतु, गेल्या दोन-तीन दिवसांमध्ये जो काही प्रकार झाला तो सबंध महाराष्ट्राने पाहिला. 6 जून रोजी आपण सगळे आनंदात असताना काही समाजकंटकांनी आक्षेपार्ह असे स्टेटस ठेवले. औरंगजेब आणि टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारे स्टेटस होते. म्हणून हिंदू युवकांच्या, हिंदुत्ववादी संघटनांच्या, आम्हा सर्व हिंदूंच्या भावना भडकवण्याचे काम जाणीवपूर्वक या मंडळींनी केलं. आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल त्यामुळे कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली. त्या बंदच्या दिवशी खूप मोठ्या प्रमाणात लोक एकत्र जमले आणि मोठी गर्दी झाली. गर्दीला चेहरा नसतो, त्या ठिकाणी काही प्रकार घडले, पण शासनाने त्यामध्ये हस्तक्षेप करुन सगळं नियंत्रणामध्ये आणलं आहे."


महाडिकांचे सतेज पाटलांकडे अप्रत्यक्ष बोट 


महाडिक यावेळी बोलताना म्हणाले की, "माझा प्रश्न असा आहे की, या दोन तीन महिन्यांमध्ये असे सगळे प्रकार कसे काय होत आहेत. आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याने काही दिवसांपूर्वी असं वक्तव्य केलं होतं की, भविष्यामध्ये राज्यातील शिवसेना-भाजपचे सरकार आहे ते जाणीवपूर्वक जातीय दंगली घडवून आणतील. तुम्हाला माहित आहे कोण नेता आहे तो. दैनिकांमधून आलेलं आहे, त्यांची स्वतःची सगळी वक्तव्ये युट्यूबवरती आहेत. अशी वक्तव्ये करताच दोन लव्ह जिहादची प्रकरणे झाली."



ते पुढे म्हणाले की, आपल्या महाराष्ट्रमध्ये औरंगजेब, टिपू सुलतान असेल त्यांचं उदात्तीकरण करत असेल, तर त्यांना महाराष्ट्रामध्ये राहण्याचा अधिकार नाही ही भावना सर्व हिंदू बांधवांची आपल्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये होती. काही अपप्रकार झाले ते थांबवण्यात आले आहेत. आमची मागणी एवढीच आहे की हे प्रकरण त्याच्या पाठीमागे कोण आहे, हे स्टेटस ठेवणारी लोक अल्पवयीन असल्याचे सांगितले जाते, पण परिणाम काय होतील हे न समजण्याएवढे ते अल्पवयीन नाहीत. परंतु, त्यांचा बोलवता धनी कोण, त्यांना स्टेटस ठेवण्यासाठी कुणी भाग पाडलं आणि त्यांना पाठिशी कोण घालत आहे, यांच्यावर कोणाचा वरदहस्त आहे या सगळ्याचा सखोल तपास झाला पाहिजे ही आमच्या हिंदू बांधवांची मागणी आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या