Kolhapur Violence: कोल्हापुरात दंगलसदृष्य परिस्थिती निर्माण होत असताना गरज असल्यास आपण रस्त्यावर उतरू आणि लोकांना शांत राहण्याचं आवाहन करु असं आपण जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि विशेष पोलिस महानिरीक्षकांना बुधवारीच सांगितलं होतं, पण त्यांच्याकडून काही रिस्पॉन्स आला नाही असं कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी (Shahu Maharaj On Kolhapur Violence) सांगितलं. अशा धार्मिक घटना घडणं हा कोल्हापूरचा इतिहास नाही, या घटनांच्या मुळापर्यंत जाऊन चौकशी केली पाहिजे असंही ते म्हणाले. 


शाहू महारांजांच्या या वक्तव्यानंतर कोल्हापूर  प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शाहू महाराज म्हणजे कोल्हापुरातीलच नव्हे तर महाराष्ट्रात एक सुसंस्कृत आणि सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व. कोल्हापूरकरांच्या मनामध्ये त्यांच्याप्रती सर्वोच्च आदर आहे. प्रशासनाने शाहू महाराजांना घेऊन लोकांना आवाहन केलं असतं तर कदाचित ही वेळच आली नसती. पण कोल्हापुरात दंगलसदृष्य परिस्थिती (Kolhapur Riots) निर्माण झाली असताना, धार्मिक मुद्द्यावरुन तणाव निर्माण झाला असताना पोलिसांनी आणि प्रशासनाने शाहू महाराजांच्या आवाहनाकडे (Shahu Maharaj On Kolhapur Dangal) जाणूनबुजून दुर्लक्ष केले का असा सवाल उपस्थित केला जात आहे. 


Shahu Maharaj Appeal To Kolhapur : वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू...


लोकं शांत राहण्यासाठी वेळप्रसंगी आपण रस्त्यावर उतरू आणि लोकांना शांत करु, गरज असल्यास तुम्ही मला तसं सांगा असं कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, पोलिस अधीक्षक पंडित आणि विशेष पोलिस महानिरीक्षक फुलारी यांना सांगितलं होतं. पण या दोघांनाही त्याची गरज वाटली नसावी, त्यामुळेच त्यांनी आपल्याला कल्पना दिली नसावी असं शाहू महाराज म्हणाले. 


शाहू महाराज म्हणाले की, सामाजिक सलोखा हा कोल्हापूरचा गाभा आहे. आपल्या लोकशाहीला आता 75 वर्षे झाले आहेत, आता आपण नवीन युगात राहतोय. अशा वेळेस आपल्या पूर्वजांच्या विचार आणि त्यांच्या शिकवणी आपल्या डोळ्यासमोर असणे गरजेचे. कोल्हापुरात यापूर्वी कधीही असं झालं नव्हतं. त्यामुळे ही घटना का घडली, यामागे कारण काय आहे याच्या मुळापर्यंत जाणं गरजेचं आहे. या प्रकरणाकडे सायकॉलॉजीच्या दृष्टीकोनातून पाहिले पाहिजे.


शाहू महाराज पुढे म्हणाले की, सर्वांनी सलोख्याने राहिले पाहिजे यासाठी प्रयत्न केले पाहिजे. सर्वात पहिला सुव्यवस्था ठेवण्याची जबाबदारी शासनाची आणि गृहखात्याची असते. त्यांनी या संबंधित सर्व रिपोर्ट घेतले पाहिजे आणि अशा घटना परत होऊ नये याची काळजी घेतली पाहिजे. संभाजीनगर, नाशिक, आता कोल्हापूर याचा अभ्यास करून याची काही लिंक आहे की या सर्व घटना वेगवेगळ्या आहेत का याकडे पाहिले पाहिजे. पोलिसांनी आता यापुढे सतर्क राहिले पाहिजे आणि त्यांची जी तपास यंत्रणा असते ती जास्त अॅक्टिव्ह व्हायला हवी.


आपण जिल्हाधिकारी, एसपी आणि विशेष पोलीस महानिरीक्षक यांना बोललो होतो की काही गरज वाटली तर स्वतः रस्त्यावर येऊन लोकांना शांत राहायला सांगायला तयार आहे, मात्र त्यांना कदाचित त्याची आवश्यकता वाटली नसावी. त्यामुळे त्यांनी मला नसेल काही कल्पना दिली असं शाहू महाराजांनी म्हटलं. 


हे प्रकरण फास्ट ट्रॅक वर झाले पाहिजे आणि आरोपींना कायदेशीर शिक्षा व्हायला हवी. लोकांना आपला इतिहास माहिती असायला हवा आणि काय स्टेटस (kolhapur viral status) लावायचे याबाबत काळजी घ्यायला हवी असं शाहू महाराज म्हणाले. माझ्यासह सर्वजण या व्हिडीओ नंतर अपसेट आहेत. प्रशासनाला वेळ देण्याची गरज आहे, यामागे काही लिंक आहे का याकडे पाहायला पाहिजे असंही ते म्हणाले. 


Shahu Maharaj On Devendra Fadnvis : हे देवेंद्र फडणवीसांचे अपयश नाही... 


कोल्हापुरात अशी परिस्थिती निर्माण होणं हे राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांचं अपयश म्हणावे लागेल का असं शाहू महारांना विचारल्यास ते म्हणाले की, एकाच व्यक्तीला या प्रकरणावर जबाबदार धरणे चुकीचे आहे. सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी, दोघांनीही मर्यादा ठेवाव्यात. अशा दंगलीमुळे लोकांचे हाल होत असतात, याचं भान असले पाहिजे. प्रत्येकाने शांतता कायम राहील यासाठी तसे वागले पाहिजे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या विचारांवर चालण्याची आपल्याला गरज आहे. लोकशाहीमध्ये सुराज्य आणायचे असेल तर तसे सर्वांनी एक दिलाने राहिले पाहिजे.