कोल्हापूर : कोल्हापुरात विधानसभेच्या जागावाटपावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये चांगलीच जुंपली आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते राजेश क्षिरसागर यांनी दक्षिण मतदार संघात मेळावा घेऊन भाजपला आपली ताकद दाखवून दिली. भाजपने उत्तर मतदार संघावर दावा केल्यानंतर क्षीरसागर यांनी थेट दक्षिण मतदार संघात मेळावा घेत महाडिक कुटुंबियांना आव्हान दिलं आहे हा मतदारसंघ भाजपचा असून माजी आमदार अमल महाडिक यांची उमेदवारी निश्चित मानली जात आहे.खासदार धंनजय महाडिक यांचे सुपुत्र कृष्णराज महाडिक हे उत्तर मतदार संघातून इच्छुक आहेत. दोन्ही जागा भाजपने मागितल्याने क्षीरसागर चांगलेच आक्रमक झाले आहेत. क्षीरसागर यांनी महाडिक आणि दक्षिण बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या सतेज पाटील या दोघानाही शक्तिप्रदर्शन करुन ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. 


उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार


राजेश क्षीरसागर म्हणाले की, उत्तर तर आम्ही जिंकणाराच आहोत. मात्र, दक्षिणमध्येही आमची ताकद चांगली निर्माण झाली आहे त्यामुळे दक्षिण देखील शिवसेनेचा मतदारसंघ आहे. शहरी भागात कुटुंब वाढल्याने दक्षिणमध्ये काही लोक राहायला आले आहेत. दक्षिणमधील लोक देखील शिवसेनेला मानणारा आहे. ते पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महायुती पुन्हा सत्तेत येणार हे ज्योतिषाने सांगण्याची गरज नाही. उत्तर तर आम्ही जिंकणारच आहोत मात्र दक्षिणचा आमदार आम्हीच ठरवणार आहोत. 


उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला


उत्तरच्या जागेवर म्हणाले की, 1089 पासून शिवसेना उत्तर मधून विधानसभा निवडणूक लढवत आहे आणि लोकसभा देखील लढवत आहे. जेव्हा जेव्हा शिवसेनेला संधी मिळाली तेव्हा मोठ्या प्रमाणात मते मिळाले आहे आणि 2 वेळा भाजपला संधी मिळाली मात्र त्यांना उत्तर बदलून निवडून येता आलेले नाही. त्यामुळ वरिष्ठ निर्णय घेतील महायुतीच्या दुधामध्ये मिठाचा खडा पडू नये यासाठी आमचा प्रयत्न असेल. लोकसभा निवडणुकीमध्ये देखील शिवसेनेचे उमेदवार यांच्या विरोधात ज्या पद्धतीने टीका झाली म्हणजे उमेदवाराला डॅमेज करण्याचा प्रयत्न झाला आरोप राजेश क्षीरसागर यांनी स्थानिक भाजप नेत्यांवर आरोप केला. आम्ही सर्व सोडून त्यांच्यासोबत गेलेलो आहोत हे त्यांनी पाहिलं पाहिजे, असेही ते म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या