कोल्हापूर : गेल्या 24 तासांपासून कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील एकूण 56 बंधारे पाण्याखाली गेल्याने पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू आहे. कोल्हापुरात राजाराम बंधाऱ्यावर पंचगंगा नदीची पाणी पातळी 32 फूट पाच इंचांवर पोहोचली आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. दरम्यान गेल्या 24 तासात पावसाने हजेरी लावल्यानंतर आज (8 जुलै) सकाळपासून पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे थोडासा दिलासा मिळाला आहे. दरम्यान संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वदूर पाऊस होत असल्याने छोटे आणि लघु प्रकल्प वेगाने भरले आहेत. राधानगरी धरणामध्ये 36 टक्के पाणीसाठा झाला आहे. धरणात 2.97 टीएमसी पाणीसाठा आहे. 


जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली? 



  • पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ

  • वारणा नदी- चिंचोली, माणगांव

  • भोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे,

  • कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली, बाजार भोगाव, पेंडाखळे,  

  • घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी

  • हिरण्यकेशी नदी - साळगांव,

  • ताम्रपर्णी नदी- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर, माणगाव, न्हावेली

  • दुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत

  • तुळशी नदी - बीड 

  • धामणी नदी - सुळे, पनोरे आंबर्डे, गवशे

  • कुंभी नदी - कळे, शेनवडे, मांडूकली, सांगशी 

  • वेदगंगा नदी - निळपण, वाघापूर, कुरणी, बस्तवडे, चिखली, गारगोटी, म्हसवे


जलसंधारण विभागाकडील कोणते प्रकल्प भरले?


आजरा तालुका


1.घाटकरवाडी 
2.गवसे 


राधानगरी तालुका 


1.झापाचिवाडी 
2.खामकरवाडी 


भुदरगड तालुका 


1.वासनोली 


पूर्ण क्षमतेने भरले असून सर्व धरणे सुस्तितीत आहेत 


आज (8 जुलै) सकाळी 9:00 वाजता  राजाराम बंधारा पाणी पातळी


32' 05" ( 540.07m)
विसर्ग  33285cusecs
( नदी इशारा पातळी  39'00" व धोका पातळी - 43'00")
*एकुण पाण्याखाली बंधारे - 56


राधानगरी तालुक्यातील काय स्थिती?


गवशी बंधाऱ्यावर पाणी आल्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली आहे.


वेतवडे येथील पूलावर पाणी आल्याने वाहतूक बंद झाली आहे वाहतूक मणदुर मार्गे चालू आहे.


जलसंधारण विभागाकडील शाहूवाडी तालुक्यातील लघु पाटबंधारे तलाव 1.भंडारवाडी 2.बुरमबाळ 3.इजोली 4.बर्की 5.वाकोली 6.येळवण जुगाई 7.आयरेवाडी 8.गावडी पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत


राधानगरी तालुक्यातील असणे तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या