कोल्हापूर : कोल्हापूर शहर परिसरात पावसाने उघडीप दिली असली, तरी धरण क्षेत्रात सुरु असलेल्या धुवाधार पावसाने धरणांच्या पाण्यात वेगाने वाढ होत आहे. जिल्ह्यात पावसाची संततधार सुरुच असल्याने 28 कोल्हापुरी बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात 3.12 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. आज (5 जुलै) सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून 1200 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे. दरम्यान, जांबरे मध्यम प्रकल्प आज पहाटे 2 वाजता पूर्ण क्षमतेने भरला. दुसरीकडे पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला दडी मारल्यानंतर उत्तरार्धात आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने नदी आणि धरणांच्या पाण्यात मोठी वाढ झाली आहे.
जिल्ह्यातील कोणते बंधारे पाण्याखाली
- पंचगंगा नदी- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ
- वारणा नदी- चिंचोली
- भोगावती नदी- हळदी, राशिवडे व सरकारी कोगे,
- कासारी नदी- यवलूज, पुनाळ तिरपण, ठाणे आळवे व वालोली
- घटप्रभा नदी- पिळणी, बिजूर-भोगोली, हिंडगांव, कानडे-सावर्डे, अडकूर, कानडेवाडी व तारेवाडी
- हिरण्यकेशी नदी - साळगांव, ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, हल्लारवाडी, काकर व माणगाव
- दुधगंगा नदी- दत्तवाड असे 28 बंधारे पाण्याखाली आहेत.
जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा
राधानगरी 3.12 टीएमसी, तुळशी 1.48 टीएमसी, वारणा 13.85 टीएमसी, दूधगंगा 6.53 टीएमसी, कासारी 1.03 टीएमसी, कडवी 1.41 टीएमसी, कुंभी 0.97 टीएमसी, पाटगाव 1.90 टीएमसी, चिकोत्रा 0.52 टीएमसी, चित्री 0.79 टीएमसी, जंगमहट्टी 0.68 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.93 टीएमसी, सर्फनाला 0.15 टीएमसी व कोदे लघु प्रकल्प 0.15 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे
राजाराम 26 फूट, सुर्वे 25.2 फूट, रुई 55.2 फूट, इचलकरंजी 52.4 फूट, तेरवाड 43.3 फूट, शिरोळ 36.3 फूट, नृसिंहवाडी 33.6 फूट, राजापूर 22.8 फूट तर नजीकच्या सांगली 10 फूट व अंकली 12.7 फूट अशी आहे.
इतर महत्वाच्या बातम्या